हे प्रमाणपत्र कुठे मिळतं यापूर्वी डोमिसाइल प्रमाणपत्र हे मुंबई कोर्टामध्ये दिलं जात होतं. हे मिळवण्यासाठी अनेक कागदपत्र गोळा करावी लागायची. मग कोर्टाच्या कामांमुळे हे मिळण्यास उशीरही व्हायचा. मात्र आता जिल्हाधिकारी यांच्या मार्फत सेतू कार्यालयात, महा ई-सेवा केंद्रात आपले सरकारी वेबसाइवर ऑनलाइन पद्धतीने हे उपलब्ध होतं.
सेतूवरुन हे सर्टिफिकेट कसं काढायचं? सेतू केंद्रावरुन सर्टिफिकेट काढायचं असेल तर काय प्रक्रिया आहे ते आपण पाहूया. कोर्ट फी स्टॅम्प अर्जाच्या छापील प्रत काढून त्याच्यावर चिटवा. यामध्ये जन्म तारीख आणि जन्म ठिकाणाचा पुरावा, जन्म महाराष्ट्राच्या बाहेरील असेल तर सलग 10 वर्षांपासून तिथे राहत असल्याचा पुरावा. मुळ राज्याचा अधिवास स्वशुखीने सोडणे आणि महाराष्ट्राचा अधिवास स्वीकारत असल्याचे प्रतिज्ञापत्र, अर्जदाराचं वय 18 वर्षांपेक्षा कमी असेल तर वडिलांचे/ पालकांचे अधिवास प्रमाणपत्रांची प्रत येथे जोडून अर्ज करावा लागतो.
ऑनलाइन कसा भरायचा अर्ज? आपले सरकार या वेबसाइवर ऑनलाइन डोमिसाइल सर्टिफिकेट मिळण्याची सुविधा मिळते. त्यानुसार डोमिसाइल सर्टिफिकेटसाठी अर्ज करता येतो. aaplesarkar.mahaonline.gov.in या वेबसाइटवर अर्जदाराला आपलं लॉगइन आयडी, तिथे मागितलेली आवश्यक माहिती, डॉक्यूमेंट आणि फिस भरावी लागेल.
महा ई-सेवा केंद्रावरुन कसा मिळवायचं सर्टिफिकेट? अनेक ठिकाणी महा ई सेवा केंद्र असतात. या केंद्रांची माहिती महाऑनलाइनच्या वेबसाइटव दिली आहे. त्या केंद्रांवर आवश्यक ते डॉक्यूमेंटच्या मदतीने आणि अर्जदाराची माहिती भरलेल्या पूर्ण अर्जाच्या साहय्याने हा अर्ज करता येऊ शकतो.






