Home आपला जिल्हा Breaking News उत्पन्न दाखले, जात प्रमाणपत्र, नॉनक्रिमिलीअर, डोमिशिल प्रमाणपत्र सर्व्हर डाऊन दाखल्यांसाठी विद्यार्थी, नागरिकांची...

उत्पन्न दाखले, जात प्रमाणपत्र, नॉनक्रिमिलीअर, डोमिशिल प्रमाणपत्र सर्व्हर डाऊन दाखल्यांसाठी विद्यार्थी, नागरिकांची धावपळ

158

 कार्यालयाचे सर्व्हर डाऊन    दाखल्यांसाठी विद्यार्थी, नागरिकांची धावपळ
एक खिडकी योजनेसह  नायब तहसीलदार, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी कार्यालयातील ऑनलाइन सर्व्हर डाउन असल्याने विद्यार्थ्यांसह नागरिकांना आवश्यक दाखले, कागदपत्रांसाठी धावपळ करावी लागत आहे.
सध्या शाळा, कॉलेज प्रवेश प्रक्रिया सुरू असून त्यासाठी विद्यार्थी व पालकांना उत्पन्न दाखले, जात प्रमाणपत्र, नॉनक्रिमिलीअर, डोमिशिल प्रमाणपत्र आवश्यक असतात. दहावी, बारावीचे निकाल लागल्यानंतर सर्व पालक तहसील कार्यालयात कागदपत्रे घेऊन येतात. मात्र, सुरुवातीलाच अर्ज स्वीकारणाऱ्या खिडकीतून त्यांच्या त्रासाला सुरुवात झाली आहे. दाखल्यांसाठी कागदपत्रे ऑनलाईन
अपलोड करताना सर्व्हर डाऊन असल्याने एका दाखल्याची कागदपत्रे जमा करताना अर्धा अर्धा तास वाट बघावी लागत आहे. त्यानंतर ही कागदपत्रे तपासणी व ऑनलाईन दाखले तयार करण्यासाठी अधिकाऱ्यांकडे जातात. मात्र त्यांच्याकडे सुद्धा सर्व्हर नीट नसल्याने एका दिवसात अगदी काहीच दाखले तयार होत आहेत. दाखले वेळेवर तयार होत नसल्याने तारांबळ उडत आहे. ऑनलाईन सेवा झटपट कामे उरकण्यासाठी आहे.
मात्र, अनेक त्रुटी त्यात असल्याने कोणत्याही प्रकारची कागदपत्रे व दाखले वेळेत मिळत नसल्याचे दिसून येत आहे. इकडे शासन जास्तीत जास्त ऑनलाईन कामाचा आग्रह धरत आहे. त्यामुळे लोकांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. किमान शैक्षणिक प्रवेश कालावधीत तरी ही ऑनलाईन प्रणाली व्यवस्थितरीत्या काम करेल, याची दक्षता वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घ्यावी, अशी मागणी नागरिकांची आहे.