मुल :- प्रवाशांच्या जाणाऱ्या येणाऱ्या वाहतुकीच्या रेल्वे गाड्यापेक्षा रेल्वे प्रशासन मालवाहतुकीच्या गाड्यांना जास्त प्राधान्य देण्यात येत असल्याचे निदर्शनास आल्याने रेल्वे स्टेशन मूल येथील प्रवाशी आपली कैफियत आपल्या शब्दात मांडत असल्याचे दिसून आले.
दुपारी ११.०० वाजता मूल येथे येणारी रेल्वे नियोजित वेळ झाल्यानंतरही केलझर रेल्वे स्टेशनवर थांबवून आधी चंद्रपूरकडे जाणाऱ्या दोन मालगाड्या जाईपर्यंत प्रवाश्यांना रेल्वे स्टेशनवर थांबवून ठेवण्यात आल्याने रेल्वे १.४५ तब्बल पाऊण ते दोन तास उशिरा मूलला पोहचली.
एकीकडे सूर्यदेव आग ओकत असल्याने ४४ डिग्री वर तापमान असल्याने अशा उष्णतेच्या लाटेत प्रवाशांचे काय हाल होत असतील हे त्यांनाच ठाऊक.
उनाच्या तडाख्यात लोक बाहेर शेडमध्ये तर काही स्टेशनच्या आत गरमित वारा घालत बसून त्रस्त होत आहे. आणि अशा प्रवाशांना, त्यांच्या कामाला महत्त्व न देता ११.०० वा.
चंद्रपूर वरून सुटलेली पॅसेंजर रेल्वे मूल येथे दुपारी १.४५ वा. पोहचली रेल्वे ही प्रवाशांच्या सोईसाठी नसून फक्त मालवाहतुकीसाठी असल्याचे प्रवाशी आपल्या तीव्र भावना व्यक्त करीत होते. असला प्रकार मुद्दाम स्टेशन मास्टरचा नेहमीचा असल्याचेही काही प्रवासी बोलत होते. यावर रेल्वे प्रशासनाने आणि जिल्ह्यातील लोक प्रतिनिधीने गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.






