वैद्यकीय शाखेच्या प्रवेशासाठी राष्ट्रीय परीक्षा एजन्सीच्या (NEET UG Result ) महिन्यात घेण्यात आलेल्या नीट परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. या परीक्षेत कु. मोहिनी तुळशिराम आगडे हि नीट परिक्षेत ७२० पैकी ६७६ गुण मिळवून देशातुन ११६६ क्रमांकावर आली . या यशाचे मुल शहरासह तालुक्याभर कौतुक होत आहे. यात मुल शहरातील कु. मोहिनी तुळशिराम आगडे हि नीट परिक्षेत ७२० पैकी ६७६ गुण मिळवून देशातुन ११६६ क्रमांकावर आली .
माउंट कान्हेट मुल इथे ५ वी पर्यंत शिक्षण घेऊन , जवाहर नवोदय विद्यालय बाळापुर तळोधी इथे १० वीत ९५ टक्के, सेंटपाॅल ज्युनिअर कॉलेज नागपूर येथे १२ वीत ९० टक्के, दोन वर्षे भारतात कोविड ची साथ होती त्यामुळे घरीच आँनलाईन क्लासेस दोन वर्षे अभ्यास करून नागपूर इथे एक वर्ष क्लासेस केले, आई आदर्श ग्रामसेविका, वडील तांदळाच्या व्यवसायी, साधारण कुटुंबातील मोहिनी नीट परिक्षेत देशातुन ११६६ क्रमांकावर आली., सर्वत्र मोहिनीचे कौतुक होत आहे.
देशभरातून नीट परीक्षेला लाखो विद्यार्थी बसतात. त्यासाठी प्रचंड मेहनत देखील विद्यार्थ्यांकडून केली जाते. मोहिनी ने देखील नीट परिक्षेच्या तयारीसाठी प्रचंड मेहनत घेतली. त्याचबरोबर मोहिनी ने खासगी क्लास लावला होती.. ती दररोज अभ्यास करत होती.. सातत्यपूर्ण अभ्यासामुळेच हे यश मिळाले असल्याची भावना मोहिनी ने व्यक्त केली.






