Home आपला जिल्हा Breaking News एक ठार तर एक गंभीर जखमी@दुचाकीची समोरा – समोर टक्कर

एक ठार तर एक गंभीर जखमी@दुचाकीची समोरा – समोर टक्कर

131

सावली पासून १५ किमी अंतरावर कापसी व्याहाड रोडवर कापसी लगत असलेल्या नागोबा देवस्थान जवळ दुचाकीची दुचाकीला समोरासमोर धडक बसल्याने झालेल्या अपघातात निलसणी पेटगाव येथील युवक मिथुन श्रीगिरीवार यांचे गडचिरोली जिल्हा रुग्णालय येथे उपचारादरम्यान मृत्यू झाले व आशिष बोरकर निलसणी पेटगाव हे गंभीर जखमी झाले आहे त्याला पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालय गडचिरोली येथे हलविण्यात आले आहे
मिथुन श्रीगिरीवार वय ३० वर्षे हा आपल्या पोटाची खळगी भरणासाठी गडचिरोलीला दही विकून आपल्या गावी परत येतांना हा अपघात घडला मिथुन श्रीगिरीवार आणि आशिष बोरकर हे दोघेही निलसणी पेटगाव या एकाच गावचे रहिवासी आहेत.मिथुन श्रीगिरीवार घरातील एकुलता कमावता व्यक्ति असल्याने त्याच्या कुटुंबावर संकट ओढावले आहे. त्याच्या पश्चात पत्नी व दोन लहान मुले आहेत. मिथुनच्या जाण्याने परिसरातहळहळ व्यक्त होत आहे.