Home आपला जिल्हा Breaking News चिरोली गावानजीकच्या पुलासमोरील वळणावर@पोलिस शिपायाचा अपघाती मृत्यू

चिरोली गावानजीकच्या पुलासमोरील वळणावर@पोलिस शिपायाचा अपघाती मृत्यू

188

डाक देऊन परत येताना पोलिस शिपायाचा अपघाती मृत्यू पोलिस स्टेशन पोंभूर्णायेथील पोलिस शिपाई डाक घेऊन मूल येथील उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयात आले. डाक देऊन दुचाकीने परत येत असताना त्यांच्या दुचाकीचा अपघात झाला.

यात त्यांचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी सायंकाळी ५.३० घडली. विशाल गणपत खडके (४२) रा. चंद्रपूर असे मृतक पोलिस शिपायाचे नाव आहे. ते पोंभूर्णा पोलिस स्टेशन येथे कर्तव्यावर होता.

विशाल खडके हे पोंभूर्णा पोलिस ठाण्याची डाक मूल येथील उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयात देऊन दुचाकीने पोंभूर्णाला परत येत असताना चिरोली गावानजीकच्या पुलासमोरील वळणावर ते दुचाकीसह पडले. यात त्यांना गंभीर गंभीर दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाला.