मेन्टेनन्सच्या नावाखाली होते बत्ती गुल ऐन उन्हाळ्यात नागरिकांचे हाल : वीजवितरण कंपनीचे होतेय दुर्लक्ष
उन्हाळ्याच्या दिवसाला प्रारंभ होताच वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाणही वाढत असल्याचे दिसून येत आहे. ऐन उन्हाळ्यात अनियमित होणारा वीजपुरवठ्याने नागरिकांचे हाल होत आहेत. दुसरीकडे
मेन्टेनन्सच्या नावाखाली विद्युत पुरवठा खंडित केला जात आहे.
वीजवितरण कंपनीच्या वतीने मेन्टेनन्स किंवा भारनियमन केले जात असल्यास त्याची सूचना मोबाइलवर संदेशच्या रूपाने प्राप्त होत असते; परंतु, अकस्मात होणारे भारनियमन किंवा
मेन्टेनन्स असल्याचे कुठलाही संदेश ग्राहकांना येत नाही. परिणामी, वीजपुरवठा केव्हा खंडित होईल, याची माहिती नसते.
उन्हाळ्याचे दिवसअसल्यानेअनियमित वीजपुरवठा खंडितचा सर्वात जास्त फटका लहान बालके व वृद्धांना बसत आहे.गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली अंतर्गत मुल शहरातील कर्मवीर महाविद्यालय,प्रतिमा महाविद्यालय,विद्यापीठाचे परीक्षा चालू आहेत सकाळी 1 तास तसेच दुपारी लॉईन जात असल्यामुळे विद्याथ्र्यांना त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासकीय भवना समोरील सविधान चौक मुल येथील आजू बाजूची लाईन हमेशा कधी कधी जात असते याशिवाय लहान व्यापारी, लघु उद्योजक यांच्या व्यापारावरही परिणाम जाणवत आहे. विजेची गळती व तट यावर रामबाण उपाय निघालेला नाही. दुसरीकडे इमानेइतबारे विद्युत देयक भरणाऱ्यांची मात्र गळचेपी होत असल्याची दिसून येत आहे.सुंदर मुल शहरात @ऐन उन्हाळ्यात नागरिकांचे हाल : वीजवितरण कंपनीचे होतेय दुर्लक्ष असे नागरीकांन मध्ये बोलल्या जात आहे.
Home आपला जिल्हा Breaking News सुंदर मुल शहरात @ऐन उन्हाळ्यात नागरिकांचे हाल : वीजवितरण कंपनीचे होतेय दुर्लक्ष






