महिला वाहकाच्या समयसूचकतेने चालकाचे प्राण वाचले

57

राज्य परिवहन महामंडळाची चिमूर आगाराची एसटी बस प्रवाशांना घेवून चिमूर नवतळा ते कान्पाकडे येत असताना डोमाजवळ अचानक चालकाला चक्कर आल्याने बस रस्त्याच्या कडेला उलटली. या घटनेत कुणालाही दुखापत झाली नसून, सुदैवाने जीवितहानी टळली.

राज्य परिवहन महामंडळाच्या चिमूर आगाराची एमएच ४० एन- ९५८१ या क्रमांकाची बस नेहमीप्रमाणे बुधवारी सायंकाळच्या सुमारास चिमूर नवथळा डोमा मार्गे कानपा येथे गेली होती. तिथून त्याच मार्गाने चिमूर येथे परत येत असताना डोमा गावाजवळ सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास अचानक बसचालकाला चक्कर आल्याने बस उलटली.

यावेळी सहकारी महिला वाहक पकमोडे यांनी समयसूचकता दाखवत चालकाचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. या घटनेत बसमधील बंडू बोरसरे नामक एका प्रवाशाला किरकोळ दुखापत झाली. तर इतर सर्व प्रवासी सुखरूप बचावले. घटनेची माहिती मिळताच भिसी पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रकाश राऊतसह सहकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला व पुढील तपास सुरू केला आहे.