Home आपला जिल्हा Breaking News प्रतिभा नगराळे यांच्या कडून १० हजाराची मदत विहार बांधकामासाठी दिला मदतीचा...

प्रतिभा नगराळे यांच्या कडून १० हजाराची मदत विहार बांधकामासाठी दिला मदतीचा हात

128

मूल :- जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, जुनासूर्ला येथे कार्यरत असलेल्या प्रतिभा पि. नगराळे मॅडम यांनी बौद्ध समाज, जूनासूर्ला येथे बांधकाम होत असलेल्या बुद्ध विहाराला आर्थिक मदत म्हणून १० हजार रुपयांची मदत दिली.मूल तालुक्यापासून १५ की. मि. अंतरावर असलेल्या जुनासूर्ला या गावात जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा येथे दोन वर्षापासून कार्यरत असलेल्या प्रतिभा पि. नगराळे मॅडम ह्या पहिली ते चौथी या वर्गाला शिकवतात.

     शैक्षणिक कार्य करतांना समाजाप्रती आदर, प्रेम दाखवत प्रतिभा पि. नगराळे मॅडम यांनी जुनासूर्ला येथील बुद्ध विहार बांधकाम लवकरात लवकर पूर्णत्वास यावे या उद्देशाने सामाजिक बांधिलकी जोपासत १० हजार रुपयांचा धनादेश बौद्ध समाजाला दिला नगराळे मॅडम यांनी केलेली ही मदत समाजाला प्रेरणा देणारी आहे. त्यांच्या या कौतूकास्पद कार्यबद्दल बौद्ध समाजाकडून भर भरून कौतुक करण्यात आले.

यावेळेस जुनासूर्ला येथील ज्येष्ठ नागरिक प्रेमदास गोवर्धन, बौद्ध समाजाचे सचिव प्रफुल मेश्राम, शुभम उराडे, कविता गोवर्धन, स्वप्नील गोवर्धन, राजरत्न गोवर्धन व आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.