Home आपला जिल्हा Breaking News जुन्या वस्तीमध्ये रस्त्यावर कमरेपर्यंत पाणी@रस्त्यावर अतिक्रमण, नागरिक त्रस्त

जुन्या वस्तीमध्ये रस्त्यावर कमरेपर्यंत पाणी@रस्त्यावर अतिक्रमण, नागरिक त्रस्त

184

एप्रिल भिजला, ‘मे’ ची सुरुवातही धुवाधार
एप्रिलमध्ये सुरू झालेल्या पावसाचा आवेग मे महिन्यातही कायम आहे.  मुसळधार पाऊस झोडपतोय…..
आज बूधवारला सकाळी 7 वाजता पासून सुरूवात झाली तर 8.30 वाजता पर्यंत पावसाने हजेरी लावली वाजताच्या सुमारास गारपीट, विजांचा गडगडाट आणि वादळवाऱ्यासह मुसळधार पावसाने 1 तास झोडपले. मोठमोठे वृक्ष मुळासकट उन्मळून पडले. पावसामुळे शेतकऱ्यांचेही मोठे नुकसान झाले. 
त्यानंतर काही वेळ उसंत घेत पुन्हा धो-धो बरसला. असा उघडझाप करीत रात्री उशिरापर्यंत पावसाने धुमाकूळ घातला होता.
रस्त्यांवर कंबरभर पाणी
मुल शहरातील जुन्या वस्तीमध्ये रस्त्यावर कमरेपर्यंत पाणी साचल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागला. उंच भागातून आलेला प्रवाह सखल भागांत साचला होता. शाळकरी मुले व वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागला.  मुसळधार पावसामुळे काही वस्त्यांमध्ये पाणी शिरल्याची माहिती आहे.

मूल शहर ! माझे शहर ,स्वच्छ ,सुंदर शहर ! म्हणायला, ऐकायला किती छान वाटते ना? पण………

या शहराची गाथा फार न्यारीच आहे. नवीन विकसित होणाऱ्या भागातील चमकधमक एकीकडे डोळ्यांचे पारणे फेडत असताना आपण एखाद्या प्रगत शहरात असल्याचा आभास निर्माण करते तर आपल्या नगरातील जुन्या वस्तीत मुलभूत सोयीसुविधांचा अभाव आणि रस्त्याच्या अभावामुळे खाजगी जागेतून नागरिकांना जेंव्हा आवागमन करावे लागते तेंव्हा काय मनःस्थिती होते हे त्या मार्गाने एकदातरी जाऊन बघितल्याशिवाय काही समजत नाही, आणि तो मार्ग जर तुटक्या फुटक्या स्वरूपाचा आणि खड्डेयुक्त असेल आणि त्यात पावसाचे पाणी अचानक साचले असले तर………. कल्पनेनेच अंगावर काटा उभा न राहिला तरच नवल.

दिवसभर उन्ह सायंकाळी ढगाळ वातावरण कायम राखत रात्रीच्या सुरुवातीला सुरु झालेल्या अवकाळी पावसाने रात्रभर थांबून थांबून हजेरी लावली आणि या भागात पावसाचे पाणी या रिकाम्या भुख़ंडावरील खड्डे भरुन डबके साचल्यागत भासू लागले.

ऐन उन्हाळ्याच्या दिवसांत १मे महाराष्ट्र दिनी शहरातील गांधी चौक ते विश्राम ग्रुह मार्गाला जोडणाऱ्या वार्ड क्रमांक नं ०९, महात्मा फुले वार्डात जुन्यावस्ती मध्ये ही परिस्थिती आढळून आली. परिसराला पावसाच्या पाण्यामुळे डबक्याचे स्वरूप आले पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचल्याने या भागातील नागरिकांना नियोजित ठिकाणी जाण्यासाठी पाण्याच्या

डबक्यातूनच मार्ग काढावा लागला,कारण एकिकडे कुणी अतिक्रमण करुन खरा मार्ग अडवून ठेवला आहे, आणि वर्षोनुवर्षे तक्रारी व निवेदने दिल्यानंतर नगरप्रशासनाने संबंधित अतिक्रमण करणाऱ्यांना नोटीस बजावली आणि नगरप्रशासनाने मोक्का चौकशी करुन मोजणीही केली व या मार्गासाठी निधीची तरतूद करुन तो मंजूर ही केला होता .

उपलब्ध जागेवरून त्या रस्त्याचे अर्धैअधिक काम पूर्ण झाले आहे परंतू एका पंधरा फुटाच्या तुटक्या भिंतीच्या अडथळ्यामुळे अजूनही तो मार्ग रितसर मोकळा करून न दिल्याने त्या मार्गाने आवागमन बंद आहे , परिणामी मोकळ्या भुखंडातून नागरिक जाणेयेणे करीत असताना या अशा समस्येला तोंड द्यावे लागत आहे. नाल्यांचेही सांडपाणी याच भुखंडात जमा होत आहे. नागरिक तात्पुरती सोय करुन मुरुम टाकून कशीबशी सोय करुन या भुखंडातून येजा करीत आहेत.उन्हाळ्यात जर ही स्थिती असेल तर येणाऱ्या पावसाळ्यात काय आणि कशी परिस्थिती राहील ह्याची जाणीव ठेऊन नगरप्रशासनाने तातडीने हा मार्ग मोकळा करुन देण्याची मागणी पुन्हा एकदा नागरिकांनी केली आहे.