Home आपला जिल्हा Breaking News कर्मविर महाविद्यालय मूल येथे इंग्रजीचे प्राध्यापक@बेरा : एक अघोरी या चित्रपटाचे ते...

कर्मविर महाविद्यालय मूल येथे इंग्रजीचे प्राध्यापक@बेरा : एक अघोरी या चित्रपटाचे ते सह-निर्माता

172

एक अघोरी चित्रपटात डेझा ची धमाल विनोदी भूमिका !
चंद्रपूर : भारतभर मुंबई सह 300 च्या वर सिनेमागृहात प्रदर्शीत झालेला बेरा : एक अघोरी हा भयपट दिवसागणिक प्रेक्षकांच्या आवडीचा होत चालला असून भय, रहस्य या बरोबरच डेझा यांची विनोदी भूमिका प्रेक्षकांच्या मनात घर केल्यावचून राहतच नाही. शक्तिवीर धीराल, प्रेम धिराल, प्राजक्ता शिंदे, संजय राम या कलाकारा बरोबर जेस डेझा यांची विनोदी भूमिका प्रेक्षकाना कमालीची आवडायला लागली आहे.
राजू भारती निर्मित या चित्रपटाला मुंबई, हैद्राबाद, नागपूर, चंद्रपूर, पुणे, गडचिरोली, अमरावती अश्या अनेक ठिकाणी प्रतिसाद मिळत असून काही राज्यात ही चित्रपटानी जोर पकडला आहे. डेझा हे मुळात पट्टीचे गायक असून त्यांना बालपणापासूनच अभिनयाची आवड आहे.
बेरा : एक अघोरी चा भाग दोन याला देखील काही महिन्यांनंतर प्रारंभ होणार आहे. विशेष म्हणजे बॉलिवूड मध्ये अभिनयाच्या निमित्ताने नावारूपास आलेला डेझा नावाचा नट मुल (जि. चंद्रपूर) प्रा.गणेश गायकवाड कर्मविर महाविद्यालय मूल येथे इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या अभिनयाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. बेरा : एक अघोरी या चित्रपटाचे ते सह-निर्माता असून ते उत्कृष्ट गीतकार आहेत.