Home आपला जिल्हा Breaking News भारतीय सैन्य 138th टेक्निकल पदवीधर कोर्स-जानेवारी 2024

भारतीय सैन्य 138th टेक्निकल पदवीधर कोर्स-जानेवारी 2024

138

कोर्सचे नाव: 138th टेक्निकल पदवीधर कोर्स जानेवारी 2024

Total: 40 जागा

पदाचे नाव: TGC

शैक्षणिक पात्रता: संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी किंवा इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षातील उमेदवार.

वयाची अट: जन्म 02 जानेवारी 1997 ते 01 जानेवारी 2004 दरम्यान.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee: फी नाही.

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 मे 2023 (03:00 PM)

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online

भारतीय सैन्यात अर्थात इंडियन आर्मीमध्ये (Indian Army) नोकरी करण्याचं स्वप्न अनेकांनी पाहिलेलं असतं. अनेक इच्छुक युवक भारतीय सैन्यात नोकरी करण्याच्या उद्देशाने भरतीची अधिसूचना प्रसिद्ध होण्याची वाट पाहत असतात.
सैन्यातली नोकरी म्हणजे केवळ सैनिक किंवा जवान होण्यापुरतीच मर्यादित नसते. अन्य वेगवेगळ्या प्रकारच्या नोकऱ्याही सैन्यात उपलब्ध असतात. अशी वाट पाहणाऱ्यांसाठी एक सुवर्णसंधी चालून आली आहे. जानेवारी 2024मध्ये सुरू होणार असलेल्या 138व्या टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्सेसमध्ये (TGC) 40 जागा रिक्त असल्याबद्दलची अधिसूचना भारतीय सैन्याकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे.

TGC138साठी इंजिनीअरिंग ग्रॅज्युएट्स ऑनलाइन अर्ज सादर करू शकतात. जे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू इच्छितात, त्यांनी joinindianarmy.nic.in या भारतीय सैन्याच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन 17 मे 2023पूर्वी अर्ज सादर करायचे आहेत. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्यांनी सोबत दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचावी आणि त्यानुसार योग्य ती अंमलबजावणी करावी. अधिक माहिती घेण्यासाठी सैन्याच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन संपूर्ण अधिसूचना वाचावी. तसेच, अधिकृत वेबसाइटवरूनच अर्ज करावा.

महत्त्वाच्या तारखा वर दिलेल्या पदांसाठी अर्ज करण्याकरिता 18 एप्रिल 2023 ते 17 मे 2023 हा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. या कालावधीत इच्छुक उमेदवार अर्ज करू शकतात. वयोमर्यादा या पदांकरिता अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांचं किमान वय 20 वर्षं असणं गरजेचं आहे. तसंच, 1 जानेवारी 2024पर्यंत त्यांचं वय जास्तीत जास्त 27 वर्षं असणं गरजेचं आहे. या वयोमर्यादेत बसणारे सर्व जण यासाठी अर्ज करू इच्छितात. कोणती पदं भरली जाणार? सिव्हिल – 11 पदं मेकॅनिकल – 9 पदं इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स – 4 पदं कम्प्युटर एससी अँड इंजिनीअरिंग/कम्प्युटर टेक्नॉलॉजी / एमएस्सी कम्प्युटर एससी – 6 पदं इलेक्ट्रॉनिक्स – 8 पदं विविध इंजिनीअरिंग स्ट्रीम्स – 2 पदं पदांची एकूण संख्या – 40 शैक्षणिक पात्रता या पदांकरिता अर्ज करू इच्छिणाऱ्यांनी कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून किंवा विद्यापीठातून या अधिसूचनेत दिलेल्या शाखेतून इंजिनीअरिंगची पदवी (बीई किंवा बीटेक) घेतलेली असणं आवश्यक आहे. संपूर्ण अधिसूचना वाचण्यासाठी लिंक : https://www.joinindianarmy.nic.in/writereaddata/Portal/NotificationPDF/TGC-138__JAN_2024___2_.pdf ऑनलाइन अर्ज करण्यासाठी लिंक : https://www.joinindianarmy.nic.in/Authentication.aspx