Home आपला जिल्हा Breaking News पक्षांसाठी केली पाण्याची व्यवस्था @कृषी महाविद्यालय मुल अंतर्गत

पक्षांसाठी केली पाण्याची व्यवस्था @कृषी महाविद्यालय मुल अंतर्गत

148

एप्रिल महिन्यात चांगल्या प्रकारे तापमान वाढलेले असून सध्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये तापमान ४३ अंश सेल्सिअसच्या वर आहे. या वेळेस पक्ष्याना पिण्याकरिता पाण्याची गरज असून ते वन-वन फिरतात. चंद्रपूर जिल्ह्याच्या तपमानाची दाहकता लक्षात घेता, कृषी महाविद्यालय मुल अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी पक्षांसाठी मातीचे बाऊल कृषी महाविद्यालय परिसर तसेच गांधी चौक आणि तहसील कार्यालय परिसरामध्ये पक्ष्यांसाठी पाणी पिण्याकरिता मातीचे बॉऊल ठेवण्यात आले आहे.

महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. विष्णुकांत टेकाळे, यांनी या प्रसंगी सांगितले की, आपल्या सभोवतालच्या वातावरणामध्ये पक्ष्यानां फार मोठे स्थान आहे. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये पक्ष्यानां नियमित पाणी पुरवावे वपक्षी वाचवा अभियान रासेयोच्या स्वयंसेवकांनी राबवावा, तसेच सर्व सामान्य जनतेमध्ये याबाबत जागृगता निर्माण करावी असे आव्हान विद्यार्थ्यांना केले.

या प्रसंगी डॉ. रवींद्र होळी, तहसिलदार यांनी सदर रासेयोचे स्वयंसेवक उन्हाळ्यामध्ये पक्ष्यांना पाणी पुरवठा करण्याचा जो कार्यक्रम राबवीत आहे याबाबत स्तुती केली व त्यांचे अभिनंदन केले. अश्या प्रकारे विविध कार्यक्रम यापुढे सुद्धास्वयंसेवकांनी मानव, पक्षी व प्राणी कल्याणाकरिता राबवावे अश्या सूचना केल्या.या प्रसंगी श्री. नैताम साहेब, खनिज अधिकारी व श्री यशवंत पवार, नायब तहसीलदार तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ सतीश मुन्नरवार व संपूर्ण राष्ट्रीय सेवा योजनेचे
( रासेयो ) स्वयंसेवक तसेच इतर प्राध्यापक वृंद व विद्यार्थी उपस्थित
होते.