Home आपला जिल्हा Breaking News मूल बाजार समितीमध्ये ५३ उमेदवारांनी नामांकन मागे @ कुणाला खुर्ची अन् कुणाला...

मूल बाजार समितीमध्ये ५३ उमेदवारांनी नामांकन मागे @ कुणाला खुर्ची अन् कुणाला मिळणार मिर्ची

316

मूल बाजार समितीमध्ये ५३ उमेदवारांनी नामांकन मागे घेतले. १८ संचालकांसाठी ३१ उमेदवार रिंगणात आहेत.  कुणाला खुर्ची अन् कुणाला मिळणार मिर्ची उद्या होणार वाटप, बाजार समितींच्या निवडणुकीसाठी १४३ मुक्त चिन्हे
निवडणूक कोणतीही असो उमेदवारांच्या निवडणूक चिन्हांसाठी अगदी गल्ली ते दिल्लीपर्यंत सर्वच पक्षांची नजर असते, याला सहकारातील बाजार समितीची निवडणूकदेखील अपवाद नाही. या
निवडणुकीसाठी राज्य सहकार निवडणूक प्राधिकरणाद्वारा १४३
मुक्तचिन्ह निश्चित केलेले आहे.यामधूनच तीन चिन्हांचा पर्यायउमेदवारांना दिलेला आहे. ही
चिन्हेदेखील मजेदार आहेत. यामध्येकुणाला खुर्ची तर कुण्या उमेदवाराला मिर्चीदेखील मिळणार आहे.
बाजार समितींच्या निवडणुकीत 18 संचालकपदांसाठी 31उमेदवार रिंगणात आहेत. २० एप्रिलपर्यंत उमेदवारांना अर्ज माघारी . यानंतर
२१ तारखेला वैध उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आल्यानंतर या सर्व उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येणार आहे. यासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी उमेदवारी अर्ज स्वीकारतेवेळी अचूकपणे दिनांक व वेळ नोंद केलेली आहे व त्याच क्रमानुसार चिन्ह वाटप करण्यात येणार आहे.
यामध्ये एकापेक्षा जास्त उमेदवारांनी एकाच चिन्हाची मागणी केली असेल, तर प्रथम आलेल्या उमेदवारांना प्रथम प्राधान्य या तत्त्वाने निवडणूक चिन्हाचे वाटप करण्यात येणार आहे व यासाठी अर्जावर नमूद तारीख व वेळ याचा आधार घेतला जाणार आहे
तरच मिळेल सामाईक निवडणूक चिन्ह बाजार समितीच्या निवडणुकीत निवडून द्यावयाच्या एकूण जागांच्या ३० टक्क्यांपेक्षा जास्त उमेदवारांनी पॅनल करून व संबंधित उमेदवारांच्या लेखी निवेदनाद्वारे एकाच चिन्हाची मागणी करावी लागते. त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांद्वारा अशा गटास सामाईक चिन्ह देण्याची तरतूद आहे व अशा अर्जावरदेखील तारीख व वेळ महत्त्वाची आहे.
प्रथम आलेल्याला प्रथम प्राधान्य तत्त्वाचा अवलंब निवडणूक चिन्हांसाठी प्राप्त अर्जानुसार प्रथम अर्ज आलेल्यांना प्रथम प्राधान्य या तत्त्वाचा अवलंब करण्याचे निर्देश आहेत. यासाठी निर्णय देताना पॅनलद्वारा प्राप्त अर्जांवर दिनांक व वेळ ही महत्त्वाची आहे. पॅनलला चिन्ह वाटप झाल्यानंतर बाकी
उमेदवारांनाही याच तत्त्वाचा अवलंब करून निवडणूक चिन्हाचे वाटप करण्यात येणार आहे.
गाजर, फुलकोबीसह मजेशीर निवडणूक चिन्ह