Home आपला जिल्हा Breaking News विद्यार्थी शैक्षणिक मार्गदर्शन, स्पर्धा परीक्षा,व्यक्तिमत्त्व विकास विषयावर कार्यशाळा

विद्यार्थी शैक्षणिक मार्गदर्शन, स्पर्धा परीक्षा,व्यक्तिमत्त्व विकास विषयावर कार्यशाळा

140

डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालयात विद्यार्थी शैक्षणिक मार्गदर्शन, स्पर्धा परीक्षा,व्यक्तिमत्त्व विकास विषयावर कार्यशाळा

मुल प्रतिनिधी:
डॉ *श्यामाप्रसाद मुखर्जी सार्वजनिक वाचनालय मुल येथे विद्यार्थ्यांसाठी एक दिवसीय *कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते, शैक्षणिक मार्गदर्शन, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व विद्यार्थ्यांचा *व्यक्तिमत्व विकास या विषयांवर सदर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते,
कार्यशाळेचे उदघाटन बलारपूर नगर परिषद चे माजी उपाध्यक्ष* तसेच डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालयाचे केंद्रीय सचिव हरिशजी शर्मा यांनी केले, कार्यशाळेच्या अध्यक्ष स्थानी वाचनालयाचे मुल चे अध्यक्ष तसेच धनश्री नागरी सहकारी पतसंस्था मुल चे अध्यक्ष अजय गोगुलवार होते,प्रमुख अतिथी म्हणून गोंडवाना सैनिकी विद्यालयाचे उपप्राचार्य ओमप्रकाश संग्रामे , प्रा डॉ सौ किरणताई कापगते, मुख्याध्यापिका सौ सुनीता बुटे यांची उपस्थिती* होती,दीपप्रज्वलन करत तसेच श्यामाप्रसाद मुखर्जी व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करत उदघाटन सोहळा पार पडला,उदघाटनिय सत्रात हरिशजी शर्मा, ओमप्रकाश संग्रामे, डॉ प्रा सौ किरण कापगते यांनी मार्गदर्शन केले, प्रास्ताविक प्रवीण मोहूर्ले यांनी केले
कार्यशाळेचे प्रथम सत्रात नागपूर विज्ञान संस्थेच्या वर्ग 1 अधिकारी प्रा सौ मनीषा भडंग यांनी 10वी, 12 वी नंतरच्या वेगवेगळ्या कोर्सेस बद्दल,स्पर्धा परीक्षांच्या बद्दल विस्तृत मार्गदर्शन केले, द्वितीय सत्रात विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास या विषयावर गडचिरोली येथील डॉ प्रा राकेश चडगुलवार यांनी मार्गदर्शन केले, कार्यशाळेला शहरातील विविध शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते, सूत्रसंचालन वाचनालयातील विद्यार्थी आत्राम यांनी केले, कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्वश्री प्रवीण मोहूर्ले, संजय मारकवार, प्रमोद कोकुलवार, प्रवीण मोहूर्ले चिमढा, सौ प्रणिता हेडाऊ तसेच जलतरण संघटनेच्या सदस्यांनी सहकार्य केले