आधार कार्ड हरवलंय@ चिंता करू नका, ‘असं’ मिळवा नवं कार्ड

93
आधार कार्ड हा एक महत्त्वाचं दस्तावेज आहे. हे कार्ड आता आपल्या ओळखीचा एक ठोस पुरावा बनलं आहे. या शिवाय, रेशन कार्ड, पॅन कार्ड आणि इतर काही कागदपत्रं आणि बँक खात्यांशी आधार लिंक करणं देखील बंधनकारक झालं आहे.
एकूणच काय तर आता आधारशिवाय कोणतंही काम करणं जवळजवळ अशक्य झालं आहे. अशा स्थितीत जर एखाद्या व्यक्तीचं आधार कार्ड हरवलं तर त्याला चिंता वाटणं साहजिक आहे. आधार हरवल्यास तुम्हाला त्रासाला सामोरं जावं लागू शकतं. आधार हरवल्यास किंवा खराब झाल्यास, यूआयडीएआय ते सहजपणे पुन्हा तयार करण्याची सुविधा प्रदान करतं.

सर्वात चांगली गोष्ट म्हणजे ही सेवा ऑनलाइन उपलब्ध आहे. त्यामुळे तुमचं आधार कार्ड हरवलं किंवा खराब झालं तर तुम्ही घरबसल्या पीव्हीसी आधार कार्ड मागवू शकता. पीव्हीसी म्हणजेच पॉलिव्हिनाईल क्लोराईड कार्ड हे एक प्रकारचे प्लॅस्टिक कार्ड आहे, ज्यावर आधार कार्डची माहिती छापली जाते. 50 रुपये शुल्क भरावं लागेल नवीन पीव्हीसी कार्ड बनवण्यासाठी तुम्हाला 50 रुपये शुल्क भरावं लागेल.

पीव्हीसी आधार कार्डमध्ये सुरक्षित क्यूआर कोड, हॉलोग्राम, मायक्रो टेक्स्ट, कार्ड जारी केल्याची तारीख, प्रिंट केल्याची तारीख आणि इतर माहिती असते. असा करा ऑनलाईन अर्ज – UIDAI च्या https://uidai.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जा. – ‘My Aadhaar’ सेक्शनमध्ये जाऊन ‘Order Aadhaar PVC Card’वर क्लिक करा. – आपल्या आधारचा 12 अंकी किंवा 16 अंकी व्हर्च्युअल आयडी किंवा 28 अंकी आधार एनरोलमेंट आयडी तिथे भरा.

– यानंतर सिक्युरिटी कोड किंवा कॅप्चा भरा. – ओटीपी मिळवण्यासाठी Send OTP या ऑप्शनवर क्लिक करा. – रजिस्टर मोबाईल नंबरवर मिळालेला ओटीपी योग्य ठिकाणी भरा आणि सबमिटवर क्लिक करा. – सबमिशननंतर आधार पीव्हीसी कार्डचा रिव्ह्यू तुमच्या समोर दिसेल.

– यानंतर, तुम्हाला खाली दिलेल्या पेमेंट पर्यायावर क्लिक करावं लागेल. – तुम्हाला पेमेंट पेजवर नेलं जाईल तिथे 50 रुपये जमा करावे लागतील. – पेमेंट केल्यानंतर तुमच्या आधार पीव्हीसीची ऑर्डर पूर्ण होईल. – UIDAI स्पीड पोस्टाद्वारे तुमचं आधार तुमच्या घरी पोहोचवेल. ऑफलाईनदेखील मिळेल आधार जर तुम्हाला नवीन आधारसाठी ऑनलाईन प्रक्रिया करायची नसेल, तर तुम्ही ते ऑफलाइनदेखील मिळवू शकता. यासाठी तुम्हाला आधार सेंटरमध्ये जावं लागेल. तिथे जाऊन तुम्ही तुमचं नवीन आधार कार्ड सहज बनवू शकता.