महाराष्ट्र राज्य स्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा 8 एप्रिल 2023 पासून सुरू होत आहे , जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार हे या स्पर्धेचे उदघाटन करणार आहेत, सदर स्पर्धेत महाराष्ट्रातील विविध नऊ विभागातील विद्यार्थी सहभागी होणार आहेत, एक विभाग वीस विद्यार्थी म्हणजे एकंदरीत 180 विद्यार्थ्यांचा सहभाग असणार आहे, सदर स्पर्धा ही तीन दिवस चालणार आहे, 10 एप्रिल 2023 ला स्पर्धेचा समारोप आहे , मुल येथील तालुका स्टेडियम स्पर्धेसाठी सज्ज झाले असून जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश फुड, तालुका क्रीडा अधिकारी विजय डोबाळे, क्रीडा सहायक नाना आक्केवार हे स्पर्धा यशवितेसाठी मेहनत घेत आहेत.
मुल शहरातील इतिहासात प्रथमच रंगणार राज्यस्तरीय कुस्ती सामन्यांचा थरार
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे तसेच जिल्हा प्रशासन, चंद्रपूर, जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तथा तालुका क्रीडा संकुल, मुल यांच्या संयुक्त विद्यमाने मुल तालुक्यामध्ये प्रथमच मुले व मुलींच्या शालेय राज्यस्तरीय कुस्ती क्रीडा स्पर्धा 8 ते 10 एप्रिल 2023 या कालावधीत मुल येथील तालुका क्रीडा संकुल प्रांगणात आयोजित करण्यात येत आहे.
या स्पर्धेकरीता संपूर्ण महाराष्ट्रातून विविध विभागातून मुले व मुली असे एकूण 300 खेळाडू सहभागी होणार आहेत. राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धा यापूर्वी रायगड जिल्ह्यात होणार होत्या. परंतु येथील खेळाडूंचा उत्साह लक्षात घेता या स्पर्धा आपल्या जिल्ह्यात मुल येथे खेचून आणण्याचे काम पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे. या स्पर्धा चंद्रपूर जिल्ह्यात प्रथमच होत आहे.








