Home आपला जिल्हा Breaking News टोलेवाही, चिरोली आणि कांतापेठ येथे@अवकाळीने तीन घरांचे नुकसान

टोलेवाही, चिरोली आणि कांतापेठ येथे@अवकाळीने तीन घरांचे नुकसान

212

मूल, ता. ३ : अवकाळी वादळ वारा पावसामुळे घरांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले. ही घटना सोमवारी (ता. ३) दुपारी तीन वाजताच्यादरम्यान तालुक्यातील टोलेवाही, चिरोली आणि कांतापेठ येथे घडली. यात तीन घरांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहि आहे. त्यांना राहण्याची सोय आणि आर्थिक नुकसानभरपाई मिळावी अशी मागणी होत आहे.
सोमवारी दुपारी अचानक वातावरणात बदल झाला आणि वादळ वारा सह जोरदार पावसाने हजेरी लावली. यात टोलेवाही, चिरोली आणि कांतापेठ येथील प्रत्येकी तीन घरांचे मोठे नुकसान झाले. चिरोली येथील शामराव सुधाकर मोहुर्ले यांच्या घराचे वरचे सिमेंटचे छत लोखंडी एंगलसह वादळ वाऱ्यामुळे
उडून गेले. पावसामुळे दोन खोलीतील भांडीकुंडी आणि इतर सामानांची मोठे नुकसान झाले. घरातील सामान पावसामुळे भिजल्यामुळे त्यांच्यापुढे मोठी समस्या निर्माण झाली. भिंतीवरची वीट पडल्याने यांच्या घरातील एक
मुलगी किरकोळ जखमी झाली. अशाच पद्धतीचे नुकसान टोलेवाही येथील क्रिष्णा गद्येकार आणि कांतापेठ येथील एका घराचे नुकसान झाले आहे. तीन्ही ठिकाणी संबंधित तलाठयांनी पंचनामा केला