Home आपला जिल्हा Breaking News नामांकनाचा आज शेवटचा दिवस दोन सुट्ट्यांमुळे वाढल्या अडचणी

नामांकनाचा आज शेवटचा दिवस दोन सुट्ट्यांमुळे वाढल्या अडचणी

202

नामांकनाचा आज शेवटचा दिवस दोन सुट्ट्यांमुळे वाढल्या अडचणी  सोमवारी होणार गर्दी :  बाजार समित्यांची निवडणूक रंगत वाढली
कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळाच्या निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. सोमवारी दुपारी ४ वाजेपर्यंत उमेदवारी नामांकनाची वेळ आहे. परंतु, अद्यापही उमेदवारांचा फारसा प्रतिसाद नाही. बाजार समितीत
शुक्रवारपर्यंत कृषी  उत्पन्न बाजार समिती मूलच्या संचालक मंडळाच्या निवडीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची आज सोमवार दिनांक ०३/०४/२०२३ ही शेवटची तारीख असताना आदल्या दिवशी पर्यंत म्हणजे शुक्रवार दिनांक ३०/०३/२०२३ रोजी वेळ संपेपर्यंत केवळ तिन लोकांनी ४ नामनिर्देशन पत्र दाखल केले होते. (कारण शनिवार व रविवार हे सुट्टीचे दिवस होते.) जिल्ह्यातही फारसे वेगळे चित्र नाही.  जागांसाठी केवळ 04 अर्ज प्राप्त झाल्याने सोमवारी गर्दी वाढण्याचा अंदाज आहे. शनिवार व रविवार शासकीय सुट्टी आल्याने कागदपत्रांसाठी धावपळ सुरू असल्याचे सांगितले जात आहे.
 कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुका अतिशय चुरशीच्या होण्याचा अंदाज आहे. सहकार क्षेत्रातील निवडणुका पक्षचिन्हांवर होत नसल्या तरी राजकीयदृष्ट्या अतिशय वजन ठेवणाऱ्या असतात. त्यामुळे विचारधारेचे व पक्षाशी जुळलेल्या उमेदवारांना संधी मिळावी तसेच निवडून यावे, यासाठी प्रमुख राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. दिवसा बैठका तर रात्री गुप्त चर्चांनी वातावरणात रंगत आली आहे.
सर्वसाधारण गटात उमेदवारी करणाऱ्यांसाठी अमानत रक्कम ५ हजार, तर राखीव गटासाठी एक हजार रुपये आहे. अर्ज शुल्क २०० रुपये आहे. त्यामुळे हवसे-नवशे उमेदवारी अर्ज भरण्यापासून दोन हात लांब असल्याचे दिसून येत आहे. अर्ज सुविधा ऑफलाइन आहे.
सेवा सहकारी संस्था गटातून उमेदवारी करणाऱ्यांना शेतकरी असल्याचे तलाठ्याचे प्रमाणपत्र, मतदार यादीत नाव,  शेतीचा सातबारा, सूचक व अनुमोदकाचे आधार कार्ड व मतदार यादीत नाव असावे, तसेच इतर अटींची पूर्तता करणे गरजेचे आहे. सोमवारला नामांकनाची शेवटची तारीख असल्याने उमेदवारांची गर्दी वाढण्याची शक्यता आहे.