जागविला मराठी बाणा …………………. मूल येथे महिलांची काढली रॅली

131

मूल येथे गुढीपाडवा उत्सव समितीचे वतीने गुडीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या पहिल्या दिवसाचे आॅचित्य साधून  मूल शहराने अनुभवलेली ही भव्यदिव्य मिरवणूक चंद्रपूर मार्गावरील बालविकास शाळा परिसरातून निघून राष्ट्रीय महामार्गावरील गांधी चौकात येऊन ती सोमनाथ मार्गाने नगरपरिषद चौकात आली.येथे महिलांच्या बाइक रॅलीचे आयोजन केले होते. या रॅलीने मूल चे वातावरण भगवेमय झाले होते.या रॅलीमध्ये जवळपास मोठ्या संख्येने महिलांनी सहभाग घेतला.

तेथून पुढे कन्यका मंदिर चौकातून वळसा घेत किसान चौकातून वाल्मिकी वार्डातून पुन्हा महामार्गावर येत ताडाळा मार्गाने सिद्धीविनायक मंदिर होत गांधी चौकात आली ,येथे या मिरवणुकीत समाविष्ट महिलांनी मिरवणूक आयोजनाचे कारण ,त्यामागील भुमिका ,पारंपरिक महत्व व इतिहास विशद करीत आयोजीत बाईक ऱ्यालीत सहभागी महिला आणि सहकार्य करणाऱ्यांचे आभार व्यक्त करीत समारोप करण्यात आला.

ठाणेदार सुमित परतेकी आपल्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने वाहतूक व्यवस्था व इतर व्यवस्थेवर लक्ष ठेवून उपस्थित होते. महिला पोलिसांनी ऱ्याली पूर्णत्वास उत्कृष्ट सहकार्य केले व आपल्या सहकारी महिलांना त्रास होऊ नये यासाठी विशेष काळजी घेतली.

थोडक्यात काय तर गुढीपाडव्याच्या परंपरेचा योग्य अर्थ जाणून घेवून हा सण साजरा केला पाहिजे म्हणजे येणारे नवीन वर्ष सुख, समृद्धीने युक्त आणि आरोग्याने परिपूर्ण नक्कीच होईल.

या निमित्ताने मूल येथे गुढीपाडवा उत्सव समितीचे वतीने प्रत्यक्ष साकारण्याचा ,जागविला मराठी बाण , यशस्वी प्रयत्न केला गेला हे महत्त्वाचे.आदींनी सहकार्य केले.