कॉपीमुक्त अभियान दृष्टीसमोर ठेवून इयत्ता दहावीची परीक्षा गुरुवारपासून सुरू झाली. परीक्षा केंद्रातून
परीक्षेसाठी विद्यार्थी प्रविष्ट झाले आहेत. दहावीच्या अग्निपरीक्षेला प्रारंभ झाला असला तरी पालकांचीही तेवढीच परीक्षा होत आहे.मराठीच्या पहिला पेपरच्या दिवशी कुठल्याही सेंटरवर कॉपी बहाद्दर आढळला नाही.
२१ फेब्रुवारीपासून बारावीच्या परीक्षेला प्रारंभ झाल्यानंतर सर्वांच्या नजरा दहावीच्या परीक्षेवर येवून टिपल्या होत्या. परीक्षा केंद्रांवर होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी कॉपीमुक्त अभियान राबविण्यात येत आहे.
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासनपरिपत्रकानुसार कॉपीमुक्त अभियान राबविण्यासाठी तालुका स्तरावर तहसीलदार यांची तालुका नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. महत्वाचे म्हणजे तणावमुक्त वातावरणात विद्यार्थ्यांनी परीक्षा देण्याचे आवाहन प्रशासनतर्फे करण्यात आले होते. त्याचीची अंमलबजावणी सर्व परीक्षा केंद्रावर करण्यात आल्याचे आज गुरुवारी पहिल्या दिवशी दिसून आले.
मूल येथील नवभारत कन्या विद्यालय येथीलपरीक्षा केंद्रास नायब तहसीलदार यशवंत पवार यांच्या नेतृत्वात भरारीपथकाने भेट देवून केंद्राची पाहणीकेली. यावेळी नायब तहसीलदार यात ओंकार ठाकरे ठाकरे, मंडळ अधिकारी दीपकगोहणे, महेश कडवलवार आदी उपस्थित होते..केंद्र संचालक एस. एस. पुराम, सहाय्यक केंद्र संचालक एम. आर. भेंडारे यांनी परीक्षेला बसलेल्या विद्याथ्र्यांची माहिती दिली.
सदर केंद्रामध्ये तालुक्यातील नवभारत कन्या विद्यालय, नवभारत विद्यालय, स्वामी विवेकानंद विद्यालय, स्व. बापूजी पाटील मारकवार विद्यालय राजगड, विश्वशांती विद्यालय मारोडा, देवनील विद्यालयटेकाडी या सहा विद्यालयातील एकूण २६३ विद्यार्थी, विद्यार्थिनी परीक्षेला उपस्थित असल्याचे सांगण्यात आले.
पुरेशा पोलीस बंदोबस्तात सुरू झालेल्या इयत्ता दहावीच्या या परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था व्यवस्थित व पध्दतशीर असून शांततेत परीक्षा सुरू असल्याने नायब तहसीलदार यशवंत पवार यांच्या नेतृत्वातील पथकाने समाधान व्यक्त केले. सदर पथकाने शहरातील अन्य परीक्षा केंद्रांनाही भेटी देत पाहणी केली.






