Home आपला जिल्हा Breaking News कॉलेज च्या विद्यार्थ्यांची वृद्धाश्रमाला भेट

कॉलेज च्या विद्यार्थ्यांची वृद्धाश्रमाला भेट

133

एस. पी. कॉलेजच्या विद्यार्थ्यांची वृद्धाश्रमाला भेट  निशा धोंगडे यांच्या नेतृत्वात केली पाहणी

चंद्रपूर :- सामाजिक बांधिलकी जोपासत ,सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपूर येथे बी. ए. अंतिम वर्षात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना पदवीचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी संशोधन विषयाच्या माध्यमातून विविध विषयावर संशोधन करण्यास सांगितले होते व विद्यार्थ्यांना विविध गटांच्या माध्यमातून संशोधनासाठी पाठविण्यात आले. विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.यावेळेस सरदार पटेल महाविद्यालयात अंतिम वर्षात शिकत आलेल्या ग्रुप नंबर १४ या समूहाने डेबू सावली वृद्धाश्रमास भेट दिली.वृद्धाश्रमातील सर्व वयोवृद्ध यांच्याशी त्यांनी सुसंवाद साधत विचारांची देवाण-घेवाण केली. विद्यालयातील विद्यार्थ्यांनी

ग्रुप नंबर १४ मधील तृप्ती गिरडकर, कोमल गिरडकर, विवेक गिरसावळे, अजय गोडांबे, सुरक्षा गोवर्धन, अनुराग गोवर्धन या विद्यार्थ्यांनी सरदार पटेल महाविद्यालयातील डॉ. बिरादार सर यांच्या मार्गदर्शनात “वृद्धांच्या समस्येचे अध्ययन” या विषयाची निवड केली, व वृद्धांच्या समस्या जाणून घेण्याकरिता डेबू सावली वृद्धाश्रमास भेट देऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच वृद्धांबद्दल आदर, प्रेम व्यक्त करीत सामाजिक बांधिलकी जोपासत वृद्धांना फळे व बिस्किटांचे वाटप केले यावेळेस उपस्थित संस्थेच्या सदस्या निशा धोंगडे यांनी विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक केले.