मूल : कीर्तनाच्या माध्यमातून लोकशिक्षण, ग्राम स्वच्छता व समाजप्रबोधनाचे कार्य करणाऱ्या समाज सुधारक संत गाडगेबाबा यांची जयंती उत्सव मूल तालुका वरठी-धोबी समाज मंडळाच्यावतीने कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली.
या उत्सवाचे उद्घाटन नगरपरिषद मूलचे माजी बांधकाम सभापती प्रशांत समर्थ यांच्या हस्ते पार पडले. अध्यक्षस्थानी नगरपरिषद मूलचे माजी उपाध्यक्ष राकेश रत्नावार होते.
प्रमुख वक्ते म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचे प्रा. डॉ. मिलिंद भगत तर प्रमुख पाहुणे म्हणून मूल तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष राजू गेडाम, गुरुदेव सेवा मंडळ मूलचे अध्यक्ष चेतन कवाळकर,
मूल तालुका वरठी धोबी समाज मंडळाचे अध्यक्ष सुरेश ताजने आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
संचालन संगीता रोहनकर, प्रास्ताविक बंडू रोहनकर तर उपस्थितांचे आभार वामन कवाळकर यांनी मानले.
Post Views: 209