दि.२०.0१.२०२३ मुल तालुक्यातील बारा गावांना सामुहिक वन हक्क कायदा 2006 अंतर्गत सामूहिक वन हक्क मिळाला असून मनरेगा अंतर्गत आराखडा, सामुहिक वनहक्क समिती तयार करणे व वन हक्क प्राप्त ग्रामस्थांनी मिळालेल्या वनपट्ट्यांचे सीमांकन करून ,संरक्षण,संवर्धन, पुनर्जीवन व व्यवस्थापन करण्याकरिता एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन तहसील कार्यालय मुल येथे करण्यात आले.
प्रशिक्षणामध्ये या आगडी, जनाळ, फुलझरी ,कांतापेठ ,मरोडा ,करवन ,शिवापूर (चक) ,काटवन , सुशी दाबगाव ,दाबगाव (मक्ता) ,मुरमाडी , ताड भूज गावातील सामुहिक वन हक्क व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी यांना प्रशिक्षण देण्यात आले.
सदर प्रशिक्षण श्री. ए. व्ही. चनफणे सर, सहाय्यक गटविकास अधिकारी,मुल श्री दितांश तिजारे सर, मंडळ कृषी अधिकारी ,श्री.जि. आर. नायगावकर परिक्षेत्र अधिकारी वन विभाग, श्री. के.एल. कुलमथे सर,(आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय) यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.
सदर प्रशिक्षणात उपविभागीय कार्यालय मुल, तहसील कार्यालय मुल व TISS च्या वतीने अमोल कुकडे व जगदीश डोळसकर, प्रवेश सुटे व नितीन ठाकरे, रजनीगंधा घुगरे ,शुभम वनवे,सतीश वनकर,जितेंद्र गदेकर, निखील गेडाम, राजकुमार सोयाम,राज चौधरी,स्वप्नील मडावी,ग्रामसेवक, रोजगार सेवक,वन रक्षक यांनी प्रशिक्षित केले.