बिहार राज्याप्रमाणे महाराष्ट्र राज्यातील ओबीसींची‎ स्वतंत्र जनगणना करण्यात यावी : समता परिषदेची मागणी

73

बिहार राज्या प्रमाणे महाराष्ट्र‎ राज्यातील इतर मागासवर्गीयांची‎ स्वतंत्र जनगणना करण्यात यावी,‎ अशी मागणी अखिल भारतीय‎ महात्मा फुले समता परिषदेच्या‎ वतीने तहसीलदार यांच्या मार्फतीने मा.मुख्यमंत्री, मा.उपमुख्यंत्री महाराष्ट्र राज्य यांना मागणीचे निवेदन पाठविण्यात आलेले आहेत.

नुकतेच बिहार राज्यांत स्वतंत्रपणे‎ जातीनिहाय जनगणना सुरू झाली‎ आहे तामिळनाडू ,छत्तीसगड आणि‎ अनेक इतर राज्यांनी सुद्धा ओबीसी‎ जनगणना सुरू केली आहे.‎

महाराष्ट्रातील जातीनिहाय जनगणना‎ करण्याबाबत समता परिषदेने‎ वेळोवेळी मागणी केली असता‎ आतापर्यंत  ही मागणी प्रलंबित‎ ठेवण्यात आली आहे. जनगणना हा‎ विषय केंद्र शासनाशी संबंधित आहे.‎ मात्र इतर मागासवर्गीयांची स्वतंत्र‎ जनगणना करण्यासाठी केंद्र‎ सरकारने असमर्थ व्यक्त केली‎ आहे. त्यामुळे शासनाने बिहार‎ सरकार प्रमाणे ओबीसींची स्वतंत्र‎ जनगणना करावी.

सन १९९४ साली‎ केंद्र सरकारने नियुक्त केलेल्या‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाने‎ ओबीसी जनगणना कशी आवश्यक‎ आहे, हे सरकारला तिसऱ्यांदा‎ पटवून दिले सन ५ मे २०१० रोजी‎ संसदेत नाशिकचे‎ तत्कालीन लोकप्रतिनिधी समीर‎ भुजबळ, स्व. गोपीनाथ मुंडे‎ यांच्यासह शंभर खासदारांनी‎ ओबीसी जनगणनेच्या ठराव केला.‎ त्यासाठी माजी मुख्यमंत्री छगन‎ भुजबळ यांनी स्वता शरद पवार‎ यांच्या नेतृत्वात सर्वपक्षीय प्रयत्न‎ केले होते. त्यातून सन २०११ ते २०१४‎ मध्ये केंद्राने सामाजिक व आर्थिक‎ जात गणना केली. मात्र त्याची‎ आकडेवारी राज्यांना दिली नाही.‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎

देशात सन २०२१ च्या नियमित‎ जनगणनेचे काम अद्याप व्हायचे‎ आहे. त्यात ही जातीनिहाय गणना‎ करावी. तसेच बिहार प्रमाणे महाराष्ट्र‎ शासनाने इतर मागासवर्ग विमुक्त‎ जाती भटक्या जमाती व विशेष‎ मागास प्रवर्गाची जनगणना करावी,‎

अशी मागणी अ.भा. महात्मा फुले समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रा. विजय लोनबले., सौ. शशिकला ना. गावतुरे जिल्हा महिला कार्याध्यक्षा प्रा. किसन वासाडे ता. अध्यक्ष राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी, समता परिषदेचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख श्री. युवराज चावरे, समता परिषदेचे युवा कार्यकर्ते सौरभ वाढई, युवा अध्यक्ष ‘राकेशमोहूर्ले,ओमदेव मोहूर्ले श्री. परशुराम शेंन्डे,  तालुका अध्यक्ष विक्रांत मोहूर्ले,प्रा.वसंत ताजणे,प्रा.गुलाब मोेरे,श्री.कैलास चलाख,श्री.चतुर मोहूर्ले,प्रा.पुरूषोत्तम कुनघाडकर,प्रा.चक्रधर घोंगडे,श्री रूपेश निकोडे,गिरीष गुरूनुले,श्री.दुश्यात महाडोरे,प्रा.हरीष रायपूरे,श्री निलेश रायकंठीवार, श्री शशीकांत गणवीर, श्री.अमीत राऊत ,श्री. धर्मेन्द्र सुत्रपवारश्री.गुनेश निकुरे,,काशीनाथ दासरवार श्री. गिरीश गुरूनुले – , सौ.सीमाताई लोनबले,सौ.शालूताई गुरूनुले सौ. उषाताई चुधरी, सौ. सुरेखा गभणे, ,तसेच शेकडो समता सैनिक व ओबीसी कार्यकर्ते उपस्थित होते.