नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या तस्करांवर छापे; 1आरोपी अटकेत
नायलॉन मांजाची विक्री थांबविण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. पोलिसांनी 1ठिकाणी छापे टाकून 1 जणांना अटक केली. यात नायलॉन मांजासह १७,८३५/- रू माल जप्त करण्यात आला आहे.
मुल पोलिसांना नायलॉन मांजाची केली जात असल्याची माहिती मिळाली. दि.११/०१/२०२३ रोजी नायलॉन मांजा कारवाई करणे करीता मुल शहरात पेट्रोलींग करीत असतांना पोउपनि पुरुषोत्तम राठोड पो स्टे मुल यांना गुप्त बातमीदाराकडुन माहिती मिळाली की, नामे अनिल प्रेमचंद मोटवानी रा मुल हा सोमनाथ रोडवरील कन्यका बँकेसमोर असलेल्या ओम जय कन्फेश्नरी दुकानामध्ये नायलॉन मांजाची बेकायदेशिररित्या विक्री करीत आहे. अशी माहिती मिळाल्याने पो.स्टाफ, पंचासह अनिल मोटवानी याचे ओम जय कन्फेश्नरी दुकानात गेले असता अनिल मोटवानी हे हजर मिळून आल्याने त्यास नायलॉन मांजा कारवाई बाबत दुकानाची झडती घेण्याचा उद्देश सांगुन पो. स्टाफचे मदतीने पंचासमक्ष ओम जय कन्फेशनरी दुकानाची रितसर झडती घेतली असता सदर दुकानाचे दुस-या मजल्यावर लोखंडी टीन असलेल्या खोलीमध्ये एकुण ५१४ नग नायलॉन मांजाच्या लहान मोठया चक्री किंमत १७,८३५/- रू. चा मुद्देमाल पंचासमक्ष मिळुन आल्याने जप्ती पंचनामा कारवाई करून ताब्यात घेतला.
सदरची कार्यवाही . उपविभागीय पोलीस अधिकारी मल्लिकार्जुन इंगळे पो. नि. सतीशसिंह राजपूत यांचे मार्गदर्शनात पोउपनि पुरुषोत्तम राठोड, नापो अं चिमाजी / २४९७, पोअं श्रावण / २६८६, संजय / १५९१ पो स्टे मुल यांनी केली असून सदर आरोपी विरूद्ध पो.स्टे. मुल येथे कलम ५,१५ पर्यावरण संरक्षण कायदा १९८६, सह कलम १८८ भादवि प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.