मूल/तालुका प्रतिनिधी
विज्ञान व तंत्रज्ञान हा अविभाज्य घटक बनला असून नवनवीन तंत्रज्ञान विकसित करणे गरजेचे झाले आहे. यासाठी शाळेत विद्यार्थ्याच्या अंगी विज्ञानाचे धडे देणे आवश्यक झाले आहे. यासाठी शालेय स्तरापासून आयोजीत करण्यात येत असलेली विज्ञान प्रदर्शनी नक्कीच बदल घडवुन आणेल असा आशावाद गडचिरोलीचे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्रा. प्रभाकर चलाख यांनी उद्घाटनपर भाषणात केले.
सुभाष उच्च प्राथमिक शाळा मूल विज्ञान प्रदर्शनी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या विज्ञान प्रदर्शनी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नव भारत कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा. महेश पानसे होते.
तर प्रमुख पाहुणे म्हणून ॲड. अनंत बल्लेवार,मुख्याध्यापक सुखदेव चौथाले, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अशोक कडुकार , उपाध्यक्ष बंडू घेर, प्रशांत बोबाटे, मायाताई कोहपरे, संदीप जेंगटे, माला शेंडे, संतोष निकुरे , ममता हिराणी, सरीता सिडाम, युनूस खान , सतीश आकुलवार, सतीश राजूरकर, प्रा. प्रभाकर धोटे, शाळेचे मुख्याध्यापक अविनाश जगताप,पदवीधर शिक्षक राजू गेडाम आदि प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी आपले तंत्रज्ञान वापरून विविध लोकोपयोगी मॉडेल तयार केले
या मॉडेलच्या साह्याने नाविन तंत्रज्ञान विकसित होईल असा आशावाद उपस्थित मान्यवरांनी प्रतिकृतीचे निरीक्षण केल्यानंतर केले.कार्यक्रमाचे संचालन अजय राऊत, प्रस्ताविक रिना मसराम तर उपस्थितांचे आभार बंडू अल्लीवार यांनी मानले.