एमएचटीसीईटी, एनईईटी, जेईई, एमबीए, बीएड, पीएचडी, बीएससी. ॲग्री, बी. फार्म, बीएससी नर्सींग जात प्रमाणपत्र पडताळणीचे प्रस्ताव 15 डिसेंबरपासून सादर करावे

79

जात प्रमाणपत्र पडताळणीचे प्रस्ताव 15 डिसेंबरपासून सादर करावे

Ø व्यावसायिक अभ्यासक्रमाला प्रवेश घे इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना आवाहन

चंद्रपूर, दि. 7 : सन 2023-24 च्या शैक्षणिक सत्रात व्यावसायिक अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांचे जात प्रमाणपत्र पडताळणीचे प्रस्ताव 15 डिसेंबर 2022 पासून सादर करण्याचे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त विजय वाकुलकर यांनी केले आहे.

 एमएचटीसीईटी, एनईईटी, जेईई, एमबीए, बीएड, पीएचडी, बीएससी. ॲग्री, बी. फार्म, बीएससी नर्सींग इत्यादी व्यावसायिक अभ्यासक्र तसेच अभियांत्रिकी अभ्यासक्रमाचे थेट द्वितीय वर्षाला प्रवेशोत्सुक तंत्रशिक्षण पदविका अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांना मागासवर्ग आरक्षणाचा लाभ मिळण्यासाठी जात प्रमाणपत्र पडताळणी आवश्यक आहे.  

जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी विद्यार्थ्यांनी ऑनलाईन सादर केलेल्या प्रस्तावाची छायांकित प्रत, सीईटी प्रत, मुळ शपथपत्रे फॉर्म नंबर 3 व 17 आणि जातीदावा सिध्द करणारे जात व अधिवासाचे मानीव दिनांकापुर्वीचे  महसुली आणि शैक्षणिक दस्तऐवजांचे छायांकित प्रती कार्यालयात सादर करून ऑनलाईन भरणा केलेल्या पावतीची पोहोच घ्यावी. अनुसूचित जातीकरीता 10 ऑगस्ट 1950, विमुक्ती जाती व भटक्या जमातीकरीता 21 नोव्हेंबर 1961 व इतर मागासवर्ग आणि विशेष मागासवर्गाचे उमेदवारांनी 13 आक्टोबरर 1967 पुर्वीचे अधिवास पुरावे सादर करणे आवश्यक राहील, असे श्री. वाकुलकर यांनी कळविले आहे.