शेततळे अनुदान योजना, मागेल त्याला शेततळे

69

 shettale anudan yojana 2022, शेततळे अनुदान योजना 2022, shettale subsidy maharashtra,मागेल त्याला शेततळे

महाराष्ट्रामध्ये बहुतांशी भाग हा कोरडवाहू जमिनी खाली येतो. कोरडवाहू जमिनीमध्ये पाण्याची कोणतीही उपलब्धता नसल्याने आणि जमीन थोडीशी खडकाळ असल्याने शेतीचे उत्पन्न फारच कमी मिळते. 

मुरमाड, कोरडवाहू, माळरान,डोंगराळ जमीन असल्यामुळे अशा ठिकाणी विहीर खोदली किंवा बोर जरी घेतला तरी पाणी लागण्याची शक्यता फार कमी असते. अशा भागातील शेतकऱ्यांसाठी शेततळे तयार करणे एक लाभदायी आणि शेतकरी हिताचा प्रकल्प ठरू शकतो. आज आपण आपल्या या लेखात जाणून घेणार आहोत की शेततळे तयार करण्यासाठी सरकार कशाप्रकारे अनुदान देते आणि अनुदानासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया काय आहे.

पिकांना पाणी देण्यासाठी पूर्वी विहिरींचा वापर केला जात होता. पूर्वीच्या काळी विहिरींना मुबलक प्रमाणात पाणी होते, याचं कारण की भूजल पातळीही त्यावेळेस योग्य होती. पण जशी जशी विहिरींची आणि बोरवेलची संख्या वाढली तसतशी भूजल पातळी मध्ये गट झाली आणि यामुळे आता विहिरींना पाण्याची उपलब्धता नसते. अशावेळी शेततळे अनुदान योजनेअंतर्गत जर तुम्ही आपल्या शेतामध्ये शेततळे तयार केले तर पाण्याची साठवणूक करून आपण आपल्याच कोरडवाहू जमिनीला बागायती जमिनीमध्ये बदलू शकता आणि भरघोस उत्पन्न देऊ शकता. 
शेततळे आणि विहीर यांची जर तुलना केली तर विहीर खोदकामासाठी जेवढा खर्च येतो तेवढाच खर्च खर्च शेततळे तयार करण्यासाठी येतो यामध्ये खर्चाचे प्रमाण कमी किंवा जास्त होऊ शकते पण जर आपण सरासरी अंदाज काढला तर शेततळ्याला विहीर पेक्षा कमी खर्च लागतो आणि शेततळे हे फारच फायदेशीर ठरते.
शेततळे तयार करण्यासाठी आपण सरकारी अनुदान मिळू शकता यासाठी पोखरा योजना, रोजगार हमी योजना, आणि महाडीबीटी योजना या मधून आपण अनुदानाचा लाभ घेऊ शकता. 
तुम्हलापोखरा आणि महाडीबीटी योजने मधून जर शेततळ्याचा लाभ घ्यायचा असेल तर यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागतो. 
रोजगार हमी योजने अंतर्गत शेततळे अनुदान मिळवण्यासाठी आपल्याला ग्रामसेवक किंवा सदरील ग्रामपंचायतीकडे अर्ज करावा लागेल.

शेततळे अनुदान योजना-2022 महाडीबीटी वेबसाईटवर अर्ज करण्याची पद्धत. 

 • महाडीबीटी ऑफिशिअल वेबसाईट ओपन करा. 
 • महाडीबीटी डीबीटी शेतकरी पोर्टल वर युजर आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगिन करा. 
 • लोगिन केल्यावर ऑनलाईन अर्ज या पर्यायावर क्लिक करा. 
 • अनेक पर्याय दिसतील त्या पैकीच सिंचन साधने व सुविधा या पर्यायावर क्लिक करा
 • यानंतर विचारलेली माहिती सविस्तर भरा. 
 • माहिती व्यवस्थित टाकल्यानंतर अर्ज सादर करा या. 
 • बटनावर क्लिक करा. 
 • तुम्ही नवीन असाल तर पेमेंट असा पर्याय येईल त्यावर क्लिक करून कोणत्याही ऑनलाइन माध्यमातून पेमेंट करा. 
 • अर्जाची स्थिती व पोचपावती डाऊनलोड करण्यासाठी मी अर्ज केलेल्या बाबी या पर्यायावर क्लिक करा. 
 • याठिकाणी तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती पाहू शकता त्याचबरोबरीने अर्जाची पोच पावती डाऊनलोड करून घेऊ शकता.
शेततळे अनुदान योजना-2022 अनुदान साठी लागणारी पात्रता

 • ज्या शेतकऱ्याला शेततळ्यासाठी अर्ज करायचा आहे त्याच्या नावावर किमान कमीत कमी ०.६ हेक्‍टर जमीन असणे आवश्यक आहे.
 • लाभार्थीने यापूर्वी या योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
 • शेततळे बांधण्यासाठी खालील अटी पाळाव्या लागतील.
 • ज्या लाभार्थ्यांनी शेततळ्यासाठी खर्च केला आहे, त्याला सातबारा उताऱ्यावर शेततळ्याची नोंद करणे बंधनकारक आहे.
 • आदेश मिळाल्यानंतर शेतकऱ्यांनी त्याचे काम तीन महिन्यात पूर्ण करणे बंधनकारक आहे
 • शेततळे पूर्ण झाल्यानंतर शेततळे योजनेचा बोर्ड स्वखर्चाने लावणे बंधनकारक आहे.
 • जेवढ्या आकाराचे शेततळे मंजूर झालं आहे तेवढ्याच आकाराचे शेततळे खांदने बंधनकारक आहे.
 • शेततळ्याची काळजी घेणे व त्याची निगा राखणे ही जबाबदारी लाभार्थ्याची राहील.
 • कृषी विभागाने जी जागा निश्चित केली आहे त्याच जागी शेततळे खोदणे बंधनकारक राहील.

शेततळे अनुदान योजना-2022 साठी लागणारी कागदपत्रे

 • जमिनीचा सातबारा
 • ८-अ उतारा
 • आधार कार्ड