मुल शहरात भुरट्या चोरांचा सुळसुळाट; पोलीस गस्त वाढविणाची मागणी

123

मूल शहरात भुरट्या चोरांनी चांगलाच धुमाकूळ घातला असून तहसील कार्यालय परिसरात अनेक दुकान
फोडून रोख रक्‍कम लंपास केल्याने शहरवासीय चांगलेच भयभित झाले आहेत.तहसिल कार्यालय परीसरात अनेक नगरपरिषद मुल ने मनुष्यबळ लावून केलेल्या आॅफलाईन पथविक्रेता सव्र्हेक्षण यादी मध्ये सदर व्यक्तीचे नावाची नोंद असून स्थाई /अस्थाई स्वरूपात दुकान लावून आपली उपजिवीका करीत असतात केद्र शासन पुरस्कृत पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भार निधी पथविक्रेत्यासाठी विशेष सूक्ष्म पतपुरवठा सुविधा येाजने मधून रूक्कम रूपये 10,000 ते 20,000 पर्यत कर्ज काढून दुकाने थाटाली आहेत.किरकोळ व्यावसायीक व्यवसाय करुन कुटुंबाच्या उदरनिर्वाह चालवित आहे.
ऑनलाईन जॉब वर्क आणि झेरॉक्सचे बहुतांश दुकानं असुन गरीब बेरोजगार तरुणांचे जगण्याचे आधार आहे.
मागील आठवड्यात भुरट्या चोरांनी गो घातला. येथील अनेक दुकानांचे कुलुप तोडून त्यातील
नगदी रोख रक्‍कम लंपास केली. तहसील समोरील जीके मोबाईल, पत्रकार भवना शेजारील एल॒आयसी
प्रीमियम पॉर्डट, तुकाराम चाय टपरी य तोडुन त्यातील रोख रक्‍कम चोरुन नेली. दरम्यान अंधाराची संधी
साधुन घरासमोरील दुचाकी मधील चोरी होऊ लागले असुन कुलुप बंद घराचे कुलुपही तोडुन पाहण्याच्या
अनेक घटना शहराच्या काही भागात घडत असल्याने शहरवासीयांमध्ये भिती निर्माण झाली आहे. त्यामूळे मूल
शहरात पोलीसांची गस्त वाढवावी. अशी मागणी होत आहे.