उमेदतर्फे तालुकास्तरावर दिवाळी फराळ महोत्सव- 2022बचतगटांचे उत्पादने खरेदीचे उपविभागीय अधिकारी श्री. मा.  महादेव खेळकर यांचे आवाहन

81

मूल : दिवाळीनिमित्त विविध वस्तूंची खरेदी करताना ग्रामीण भागातील स्वंयसहायता समुहांनी उत्पादीत केलेले खादयपदार्थ तसेच आकाशदिवे, उटणे याची खरेदी करुन त्यांचा उत्साह आणि उत्पन्नात भर घालून ही दिवाळी अनोख्या पदधतीने साजरी करावी, असे आवाहन  मूल चे उपविभागीय अधिकारी श्री. मा.  महादेव खेळकर यांनी केली आहे. यावर्षी तहसील परिसर व पंचायत समिती परिसरात दिवाळी फराळ महोत्सव- 2022 चे आयोजन करण्यात आले आहे आज त्यांचे उद्घाटन उपविभागीय अधिकारी श्री. मा.  महादेव खेळकर यांच्या हस्ते व गट विकास अधिकारी श्री. मा. देव घुनावत यांच्या उपस्थितीत पार पडले.उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत जिल्हयात मोठया प्रमाणात स्वयंसहायता समुह कार्यरत असून, यातील अनेक महिला या नाविण्यपुर्ण वस्तूंची निर्मिती करीत असतात.

येत्या दिवाळीच्या पार्श्वभूमिवर या महिलांकडून विविध स्वरुपाची खादयपदार्थ तयार केले जात आहेत. दिवाळीनिमित्त खादयपदार्थ व अनुषंगीक सजावटीच्या वस्तू नागरिकांनी खरेदी केल्यास त्याचा ग्रामीण भागातील महिलांना खूप फायदा होणार आहे. नुकेतच पंचायत समिती परिसरात झालेल्या प्रदर्शनाला मूल वासीयांनी मोठा प्रतिसाद दिला होता.यावर्षी दिनांक 17 ते 21 ऑक्टोबर 2022 तहसील व पंचायत समिती परिसरात दिवाळी फराळ महोत्सव साजरा करण्यात येत असून, यात विविध साहित्य विक्रीस उपलब्ध आहे. एकमेकांना भेट देताना स्थानिक व ग्रामीण वस्तूचा वापर करावा, जेणेकरुन ग्रामीण भागातील महिलांच्या घरातही आनंद पोहोचेल, असे आवाहन मूल चे उपविभागीय अधिकारी श्री. मा.  महादेव खेळकर तसेच गट विकास अधिकारी श्री. मा. देव घुनावत यांनी केले आहे.याप्रसंगी तालुका अभियान व्यवस्थापक नितीन वाघमारे, तालुका व्यवस्थापक निलेश जीवनकर, प्रशासन तथा लेखा सहाय्यक वसीम काझी, तालुका समन्वयक जयश्री कामडी, स्नेहल मडावी, प्रभाग समन्वयक अमर रंगारी, संगीता शिंदे, सिद्धार्थ वाळके, रुपेश आदे, deo मयूर भोपे , विशाल देवगडे ब्लॉक अँकर तसेच उद्योग सखी, mcrp तसेच समूहातील महिला उपस्थित होते.