तहसिल कार्यालय चंद्रपूर येथे आधार दास्तवेज अद्यावत करणे तसेच आधार प्रशिक्षण

69

 चंद्रपूर जिल्हयातील नागरिकांचे आधार दास्तवेज अद्यावत करणे तसेच आधार बाबत अडचणी बाबत आज मार्गदर्शन करण्याकरिता प्रशिक्षण तहसील कार्यालय,चंद्रपूर येथे आज पार पाडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निवासी उपजिल्हाधिकारी विशालकुमार मेश्राम होते तर  लालसरे सर जिल्हा समन्वयक महाआयटी चंद्रपूर तसेच मंगेश कुरेकर सर संगणक तज्ञ,सर्व डीआयटी,महाआयटी अंतर्गत सुरू असलेल्या आधार नोंदणी चालक, व ऑपरेटर उपस्थित होते. ओळखीचं प्रमाणपत्र, पत्ता इतर संबंधित कागदपत्रं अपडेट सांगितलं.

आधार कार्डमधील चुकांकडे दुर्लक्ष करता वेळीच महत्त्वाची कागदपत्रं देऊन ते अपडेट करून घेणंही तितकचं गरजेचं आहे.  कुठल्याही व्यक्तीला त्याच्या आयुष्यात केवळ एकदाच आधार नंबर दिला जातो. यूआयडीएआयच्या वतीनं हा नंबर देण्यात येतो. आधार कार्डमध्ये 12 अंकांचा एक विशिष्ट क्रमांक असतो. यामुळे संबंधित नागरिकाची माहिती मिळते. यात पत्ता, आईवडिलांचं नाव, वय यासह इतर माहिती उपलब्ध असते.

विशेष म्हणजे एखाद्या ठिकाणी आधार कार्ड देण्याची आवश्यकता असल्यास मास्क्ड आधार कार्डचा वापर करू शकता, असंही सांगितलं गेलं आहे. भारतात जन्माला आलेल्या बाळापासून अगदी वयोवृद्ध असलेल्या नागरिकाचंसुद्धा आधार कार्ड तयार करावं लागतं. जन्मलेल्या मुलाचा आधार क्रमांक त्यांच्या पालकांशी जोडला गेलेला असतो.

बाळ जेव्हा 5 वर्षांपेक्षा मोठं होतं तेव्हा त्याच्या बोटाचे ठसे घेतले जातात आणि त्याला स्वतंत्र ओळख प्राप्त होते. आधार कार्डमधील चुकांकडे दुर्लक्ष करता वेळीच महत्त्वाची कागदपत्रं देऊन ते अपडेट करून घेणंही तितकचं गरजेचं आहे. आधार संचालक हयंाना बॅनर,पोस्टर वाटप करण्यात आले.