शाळा वाचवा अभियान,गावकऱ्यांनी केली शाळा बंद न करण्याची मागणी

27

०ते २०च्या पटसंख्येच्या शाळा बंद करण्याच्या शासनाच्या निर्णया विरोधात चांदापूर हेटी येथे शाळा वाचवा अभियान अंतर्गत शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.अन्नाजी ठाकुर यांच्या नेतृत्वात “शाळा वाचवा, शिक्षण वाचवा ” अश्या प्रकारची मोहिम काढण्यात आली . यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व पदाधिकारी व सदस्य व गावातील बहुसंख्य महिला व गावकरी आणि तरूण उपस्थित होते. चांदापूर हेटी येथील शाळा बंद करू नका असा एकमताने ठराव घेण्यात आला. व शासनाला चांदापूर हेटी येथील शाळा बंद करू नये अशी विनंती ठरावामध्ये केली आहे. चांदापूर हेटी ही वस्ती चांदापूर पासून २ किमी अंतरावर असून येथे पहिली ते चौथ्या इयत्तेपर्यंतची शाळा आहे व शाळेमध्ये एकुण १७ विद्यार्थी शिकत आहेत . त्यामध्ये ५ मुले व १२ मुली असून शाळेचा दर्जा उत्तम आहे.

शाळेमध्ये सेमी इंग्रजी अभ्यासक्रम सुरू असून सर्व विद्यार्थी अभ्यासात प्रगत आहेत .जर शाळा बंद  झाली तर १७ ही विध्यार्थी शिक्षणापासून वंचित होतील . तेव्हा गावकऱ्या कडून शासनाला शाळा बंद न करण्याची विनंती आहे . त्याप्रमाणे चांदापूर हेटी येथील गावकरी ग्रामपंचायत चांदापूर येथे जाऊन ग्रामपंचायतला शाळा बंद न करण्याबाबतचा ठराव घेण्यासंबधी विनंती केली आहे .व चांदापूरच्या सरपंच सौ. सोनीताई देशमुख यांनी तसा शब्द दिला आहे . तेव्हा शासनाने कमी पटसंख्येच्या शाळा बंद करू नये .व संविधानाने व RTE कायद्यानुसार खेडया पाड्यातील मुला मुलींनी शिक्षण घेऊ घ्यावे एवढी विनंती .