वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार वनविभागामार्फत कुटुंबांना तात्काळ ३० हजाराची आर्थिक मदत

39

मुल तालुक्यातील चिरोली येथे शेतातील धानपिकाला पाणी करायला गेलेल्या शेतकऱ्यावर वाघाने हल्ला करून ठार केले. ही घटना (११ ऑक्टोंबर) सकाळी ८.०० वाजताच्या दरम्यान घडली.येवनाथ विकरुजी चुनारकर (७५ वर्षे) रा. चिरोली असे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. ही घटना चिरोली नियत क्षेत्रातील कक्ष क्रमांक ७२० मध्ये घडली. नेहमीप्रमाणे शेतात धान पिकाला पाणी करण्यासाठी सकाळी शेतात गेले असता दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक हल्ला करून ठार केले. घटनेची माहिती मिळताच चिचपल्ली येथील वनपरिक्षेत्र अधिकारी प्रियंका वेलमे, क्षेत्र सहायक मस्के, खनके, पडवे, घागारघुण्डे वनरक्षक राकेश गुरनुले,मरसकोले, रोघे, मानकर, शीतल व्याहाडकर व पोलीस कर्मचारी यांनी घटनेचा पंचनामा केला व वनविभागा मार्फत कुटुंबांना तात्काळ ३० हजाराची आर्थिक मदत देऊन मृतदेह उत्तरीय तपासणी करीता मुल येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले.