मुल येथील जागृत माता दुर्गा मंदिर महोत्सव उत्साहात संपन्न

22

चंद्रपूर जिल॒ह्यातच नव्हे तर पूव विदर्भात मुल नगरात एक जागृत माता मा.दुर्गा देवीची स्थापना २६ फेब्रुवारी २०१६ रोजी मा.दुर्गा मंदिरसेवा समिती मूलचे अध्यक्ष चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष तथा माजी जी.प.अध्यक्ष संतोष सिंह रावत यांच्या अथक प्रयत्नातूनमंदिर समितीच्या नियोजित जागेवर माता दुर्गेची भव्य मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली.

श्रद्धेनेभक्तीभावाने पार पडला. घटस्थापने पासून तर विजया दशमी पर्यंत सकाळ पासून तर रात्री पर्यंत हजारो भक्तांनी देवीचे दशन घेऊन
आशीर्वाद घेतला.

मंदिर समितीतर्फे सुप्रसिध्द गायक राजू व्यास सुनील वाघमारे निर्मित जय माता दि जागरण धार्मिक गीतांचा बहारदारकार्यक्रम आयोजित करण्यात आला.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त देशभक्तीपर समूह नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यातविजेते स्पर्धकांना प्रथम ५०००/- द्वितीय ३०००/- तृतीय २०००/- तर भव्य गरबा दांडिया स्पर्धेत प्रथम बक्षीस ११०००/- द्वितीय ७०००/- तृतीय५०००/- उत्कृष्ठ वेशभूषा २०००/- बक्षीस देण्यात आले.

बक्षीस वितरण महिला ग्रुपच्या अध्यक्ष सौ.ममता रावत, परीक्षक डॉ.मुस्तीलवार आणिमंदिर समितीचे विस्वस्थ यांचे हस्ते विजेत्या स्पर्धकांना बक्षिसे देण्यात आली.

लहान मुला मुलींचे नृत्य आयोजित करुन योग्य बक्षीस देण्यात आले.नवरात्रीत सकाळी संध्याकाळी आरतीला मंदिर बाहेर पर्यंत चक्क भक्तांच्या रांगा लागत होत्या.

माता दुर्गेचे दर्शन घेण्यासाठी माजी मंत्रीआमदार विजय वडेट्टीवार. आमदार सुभाषजी धोटे, श्री.वर्माजी, आदींनी दुर्गा मातेची आरती करुन आशीर्वाद घेतला. मातेच्या जागरण प्रसंगीमाजी मंत्री विजय वडेट्टीवार व मंदिर समिती अध्यक्ष संतोषसिंह रावत यांचेही पाय थिरकेले. ४ ऑक्टोबर रोजी महाप्रसादाचा हजारो भक्तांनीआस्वाद घेतला.

६ ऑक्टोम्बरला भव्य मिरवणुकीने दुर्गा मातेच्या घटाचे विसर्जन करण्यात आले. नवरात्र दुर्गा महोत्सव उत्सवाच्या कार्यक्रमाचे
संयोजन मंदिर समितीचे सचिव संजय पडोळे यांनी केले.

तर मंदिर समितीच्या सर्व पदाधिकारी व सदस्य, महिला पदाधिकारी व सदस्य,इत्यादींनी सहकार्य करून अथक परिश्रम घेऊन महोत्सव यशस्वी केला.