टेंबा मिरवत फिरणाऱ्या प्रवृत्तीला जाळणे गरजेचे असल्याचे मत अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद अध्यक्ष अशोक येरमे

24

महा पंडित, महा विद्वान,त्रयलोक्य विजेता, महान तपस्वी,स्त्रीचं पावित्र जोपासणारा महापराक्रमी, उत्कृष्ठ गायक, शिव भक्त, सम्राट , आदीमाचा राजा महात्मा रावण , अशा महान विभूतीची जाळून विटंबना करण्यापेक्षा समजतील निष्ठुर,पापी, खुनी, बलात्कारी, मनासन्मानाने टेंबा मिरवत फिरणाऱ्या प्रवृत्तीला जाळणे गरजेचे असल्याचे मत अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद अध्यक्ष अशोक येरमे यांनी व्यक्त केले.
ते विजया दशमीच्या दिवशी महात्मा राजा रावणाच्या महापुजेच्या कार्यक्रमा प्रसंगी बोलत होते.
पंचशील वॉर्ड क्रं.६ येथून सल्ला शक्तीचे पूजन करून “हमरा राजा कैसा हो, महात्मा रावण जैसा हो,” आन बाण और शान रावण हमारा है भगवान” अशा घोषणा देत आदिवासी गोंडीयन सगा बांधवांची रॅली संपतजी कननाके, यांचे नेतृत्वात विहीरगाव येथील सल्ला शक्ती स्थळी पोहचली. इथे सल्ला शक्तीचे पूजन करून सप्तरंगी ध्वज फडकावून महात्मा रावणाची महापूजा करण्यात आली. यावेळी समाज बांधवांना विलास आले, संपत कननके यांनी संबोधित केले.
मोठ्या संख्येने समाज बांधव रॅलीत सहभागी झाले होते.आयोजित कार्यक्रमासाठी वासुदेव आत्राम, शिंगदेव गेडाम, शालिक गेडाम, सुभाष टेकाम, सुनील कोडपे,यांनी अथक परिश्रम केले.