Ø नागरिकांच्या प्रलंबित प्रकरणांचा होणार निपटारा ,स्थानिकांच्या प्रलंबित प्रश्नांचा निपटारा स्थानिक स्तरावर करण्याच्या उद्देशाने आयोजित सेवा पंधरवडा उपक्रमास येथील मुल तहसिल कार्यालयात आज सुरुवात करण्यात आली. 10 सप्रेंबर पर्यंत दाखल प्रलंबित प्रश्नांना 2ऑक्टोबर पूर्वी सोडविण्याचे उद्दिष्ट या पंधरवड्यात ठेवण्यात आले आहे.
सर्वसामान्य नागरिकांची कामे विहीत कालावधीत पूर्ण व्हावीत,याकरिता राज्य शासनाने आपलेसरकार सेवा पोर्टल सुरू केले आहे. त्यामाध्यमातून जनतेची कामे १७ सप्टेबरते. २ ऑक्टोबर या कालावधीतराबविल्या जाणाऱया सेवा सप्ताहात पूर्णकेली जातील. नागरिकांच्या समस्या व तक्रारी ऐकून तोडगा काढला जाईल.असे तहसिलदार डॉ.रविन्द्र होळी यांनी म्ह्टले.
सेवा पंधरवड्यामधे प्रामुख्याने महसूल, ग्रामविकास, नगरविकास,कृषी, आदिवासी विकास, सार्वजनिकआरोग्य, ऊर्जा तसेच सर्व शासकीयविभागाकडील महाराष्ट्र लोकसेवाहक्क अधिनियमांतर्गत अधिसूचितसेवांविषयी प्रलंबित कामांचा निपटारा
करण्यात येणार आहे. यादरम्यान सर्व विभागांकडून योजनांचा प्रचार-प्रसार,शिबिरे आयोजित केली जाणार आहेत,
असे तहसिलदार डॉ.रविन्द्र होळी यांनीसांगितले.
मुल तहसिल कार्यालयाच्या सभागृहात झालेल्या या उद्घाटन समारंभात तहसिलदार डॉ.रविन्द्र होळी
तसेच नायब तहसिलदार पवार साहेब,कुंभारे साहेब,ठाकरे साहेब,कारकुन बेलसुरे,रेशन पुरवठा विभागातील कर्मचारी व दिनेश पुजारी कारकुन व ईतर कर्मचारी महिला कर्मचारी व ,मंडळ अधिकारी,तलाठी कर्मचारी, ज्येष्ठ नागरीक तसेच विद्यार्थी यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी तहसिलदार डॉ.रविन्द्र होळी म्हणाले, सेवा पंधरवड्याच्या निमित्ताने जनतेच्या विविध प्रलंबित प्रकरणांचा निपटारा होऊन नागरिकांना दिलासा मिळेल. पोर्टलवर प्रलंबित असलेले अर्ज येत्या 15 दिवसांत 100 टक्के निकाली काढण्यासाठी सर्वांनी गांभिर्याने काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.
शासनाच्या सामान्य प्रशासन विभागातर्फे या संदर्भात मार्गदर्शकसूचना जारी करण्यात आले आहेत यानुसार महसूल विभाग
समस्यांची सोडवणूक 2 ऑक्टोबर पूर्वी करण्याचे निश्चित करण्यात आले आहे.
आपले सरकार हे पोर्टल वरील 392 सेवा तसेच महावितरणपोर्टल वरील 24 सेवा आणि डीबीटी पोर्टल वरील 46 सेवा आणि
नागरी आरोग्य केंद्र मार्फत देण्यात येणाऱ्या सेवा आदींचा निपटाराया कालावधीत करण्याचे निश्चित करण्यात आलेले आहे.
आज झालेल्या सोहळ्यात ज्यांच्या समस्या निकाली काढण्यात आल्या अशा बारा जणांना प्रतिनिधिक स्वरूपात सातबारा,ऑफडिव्ही,मिळकत प्रमाणपत्र,डेमीसीयल प्रमाणपत्र,जातीच्रे प्रमाणपत्र,नॉन्क्रिमीलेअर,डिजीटल सातबरा,रेशन कार्ड प्रमाणपण वितरीत करण्यात आले.प्रमाणपत्रदेऊन या पंधरवड्याचा शुभारंभ मुल तालुका प्रशासनाच्या वतीनेकरण्यात आला.