रेल्वे मालधक्का निर्माण झाल्यास जनआंदोलन उभारू – मुल शहरवासियांच्या संतप्त प्रतिक्रिया

36

चंद्रपूर मार्गावरील क्रिंडागणालगत रेल्वे मालधक्का निर्माण झाल्यास मानवी जीवनावर विपरीत परिणाम परीणाम पडणार असून याचा शहरवासीयांना मोठया प्रमाणांत त्रास होणार आहे. त्यामूळे निर्माणाधिन असलेल्या मालधक्क्याचा संघटीत होवून विरोध करावा. असे आवाहन रेल्वे मालधक्का हटाव-पर्यावरण बचाव समितीच्या सदस्यांनी केला आहे.
क्रिडांगणालगत सुरू झालेले रेल्वे मालधक्क्याचे काम चार महिण्यांपूर्वी गुड माॅर्निग गृ्रपच्या विरोधामूळे बंद झाले होते. परंतू बंद झालेले सदर मालधक्का निर्माण करण्याचे काम दोन दिवसांपासून पुन्हा सुरू झाल्याने माॅर्निग ग्रृपच्या सदस्यांनी पुन्हा विरोध दर्शविला. परंतू मालधक्का निर्माण करण्यासंबंधी रेल्वे प्रशासन आणि संबंधीत अदानी कंपनीची तयारी लक्षात घेता निर्माण होणा-या मालधक्क्याचा विरोध करण्यासाठी जन आंदोलन गरजेचे आहे. त्यामूळे जनआंदोलनाच्या पुर्वतयारी करीता स्थानिक कन्नमवार सभागृहात गुड माॅर्निग ग्रृपच्या पुढाकाराने नागरीकांची सभा नुकतीच पार पडली. सभेला स्थानिक व्यापारी, राईस मिल संचालक, विविध संस्थाचे पदाधिकारी, युवक व सामाजीक कार्यकर्ते, राजकिय पदाधिकारी मोठया संख्येनी उपस्थित होते. सभेत निर्माणाधिन रेल्वे मालधक्क्या संदर्भात अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्यानंतर चंद्रपूर मार्गावरील क्रिंडांगणा लगत रेल्वे मालधक्का निर्माण होवू नये, असा एकमताने ठराव पारीत करण्यांत आला. नागरीकांच्या प्रखर विरोधानंतरही रेल्वे प्रशासन आणि अदानी कंपनीने बळजबरीने क्रिंडागणा लगत रेल्वे मालधक्का निर्माण केल्यास त्याविरूध्द जनआंदोलन करण्याशिवाय प्रसंगी न्यायालयातही दाद मागावी लागेल. अश्या संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करतांना उपस्थितांनी तालुक्यातील राजकिय पदाधिकारी, सामाजीक व सेवाभावी कार्यकर्ते, व्यापारी, विविध क्षेत्रातील कर्तबगार मंडळी, महिला मंडळ यांची संयुक्त कृती समिती निर्माण करावी. असा एकमताने निर्णय घेण्यांत आला. दरम्यान गडचिरोली जिल्हयातील सुरजागड येथील लोह उत्खननाशी संबंधीत रेल्वे मालधक्का रहदारीच्या मार्गालगत होत असल्याने पर्यावरणात ध्वनी व वायु प्रदुषण होवुन मानव व वन्यजीवांना धोका निर्माण होवू शकतो, मालधक्यात ठेवल्या जाणा-या कच्चा लोखंडामध्यें मिसळलेले कार्बन, मॅगनीज, फाॅस्फरस, गंधक, सिलीकाॅन आदि रासायनीक पदार्थामूळे शुध्द वातावरणात कार्बन मोनाक्साईड मिसळून श्वसनासाठी आवश्यक असलेल्या आँक्सीजनची मात्रा कमी होवून त्याचा आरोग्यावर विपरीत परिणाम पडणार आहे. त्यामूळे अनेक बाबतीत महत्वाच्या असलेल्या जागेवर रेल्वेने माल धक्का निर्माण न करता शहरवासीयांना त्रास होणार नाही, अश्या ठिकाणी निर्माण होण्यााठी जिल्हयातील आजी व माजी लोकप्रतिनिधींनी शासनस्तरावर पाठपुरावा करावा. अन्यथा त्यांचे घरासमोर समितीच्या वतीने धरणे आंदोलन करण्याचा निर्धार अनेकांनी सभेत व्यक्त केला. त्यामूळे सध्या मूल शहरात रेल्वे मालधक्क्याचा विषय चांगलाच चर्चेचा झाला असून याचा भविष्यात होणा-या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीवर परिणाम पडणार आहे. त्यामूळे निर्माणाधिन मालधक्का येत्या काळात तालुक्यात चांगलाच पेटणार आहे.