मूल तालुक्यात वाघाचा गुराख्यावर हल्ला,पुन्हा मानव वन्यजीव संघर्ष

82

मुल: मुल तालुक्‍यातील बफरझोन । क्षेत्रात असलेल्या फुलझरी येथील डोनी जंगलात गुऱ्हे चराईसाठी नेलेल्या गुऱ्हाख्याला वाघाने हलूला करूनगंभीर जखमी केल्याची घटना (११ सष्टे.२०२२ ला) सकाळी ११.३० वाजता घडली.
फुलझरी येथील रहिवासी असलेला किसन आबाजी वसाके (४९) असे जखमी गुऱ्हाख्याचे नाव आहे. सदर घटना डोनी बिट ३ कक्ष क्रमांक ३६०मध्ये घडली. नेहमीप्रमाणे जंगलात गुऱ्हे चराईसाठी नेले असता जंगलात दबा धरून असलेल्या वाघाने गुराख्य़ावर हलुला करून गंभीर जखमीकेले. घटनेची माहिती मिळताच लगेच वनरक्षक बोरकर यांनी आपल्या कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने जखमी गुऱहाख्याला मुल येथील उपजिल्हारुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याला गंभीर जखमी असल्याने पुढील उपचाराकरिता चंद्रपूर जिल्हा सामान्यरुग्णालयात हलविण्यात आले. वन विभागाकडून जखमी रुग्णाला तात्काळ १०,०००/- मदत देण्यात आली.