आला रे आला, गणपती आला! मुल मध्ये ‘ गणराया‘ चे जल्लोषात आगमन

45

 ढोलताशांचा गजर, गुलालाची उधळण, टाळ्यांचा नाद आणि मोरया… मोरयाच्या (Ganpati Bappa Morya) गजरात आज सकाळपासूनच उत्साही वातावरणात श्री गणेशाचे आगमन होत असून शहरात बाप्पाच्या आगमनासाठी मोठा उत्साह असून सर्वत्र ढोल ताशांसह बाप्पाचं आगमन होत आहे. त्यामुळे शहरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. भाविकांना प्रतीक्षा असलेला लाडक्या गणरायाचे आज घरोघरी वाजत गाजत आगमन होत असून या चैतन्यपर्वा मुळे भाविकांमध्ये उत्साहात शिगेला पोहोचला आहे.

मागील दोन वर्ष कोरोना काळ असल्याने गणपती बाप्पाचं आगमन झालं, मात्र फारसा उत्साh नव्हता. यंदा मात्र कोरोनाचे मळभ दूर झाल्याने भाविकांनी  जोरदार उत्साहात धुमधडाक्यात सुरुवात झाली आहे. दरम्यान आठवडाभरापासूनच गणेश मूर्ती सजावट व पूजेसाठी लागणारे साहित्य खरेदीसाठी भाविकांची गर्दी होत होती   शहरातील महत्त्वाच्या बाजारपेठ फुलून गेल्या होत्या. दरम्यान आज सकाळपासूनच गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरयाचा जयघोष करीत ढोल ताशांच्या गजरात भाविकांनी गणेश मूर्तीची खरेदी करत गणेशाचे घरोघरी आगमन तसेच मंडळांचे आगमन होत आहे.

दरम्यान घरोघरी आपापल्या पसंतीनुसार विविध आकाराच्या बाप्पांना वाजत गाजत आणले जात असून दुर्वा, फुले, धूप, दीप, पंचारती अशी साग्रसंगीत तयारी पूजेसाठी करण्यात येत आहे. पूजा साहित्य खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांमुळे बाजारपेठा फुलून गेल्या आहेत. तर आजही खरेदीसाठी शहरातील बाजारपेठांमध्ये गर्दी केली आहे. घरोघरीच्या बाप्पांच्या स्वागताबरोबरच शहरातील , दुकाने आदी ठिकाणीही गणपतीची स्थापना करुन प्रत्येकजण  आपापल्या परीने बाप्पांचे जोरदार स्वागत करीत आहे.

तसेच दोन वर्ष  शहरातील सार्वजनिक मंडळांचे गणपती स्थापना झालेली नव्हती. मात्र यंदा धुमधडाक्यात बाप्पांचे आगमन झाले असल्याने सर्वत्र उत्साहाचे वातावरण असून गणेश मंडळांचीही सकाळपासूनच धावपळ सुरू आहे.  गणरायाची मूर्ती प्रतिष्ठापनेसाठी नेण्यात येत आहेत.