मुल येथे चिमुकल्यांच्या उत्साहात रंगला तान्हा पोळा,विविध वेशभूषा ठरले आकर्षन: पर्यावरण,अंधश्रध्दा,बेटी बचायो,महागाई,स्त्री अत्याचारावर दिले संदेश

81

 तालावर झंकराची गाणी, आंब्याची पाने आणि फुग्यांचे तोरण, रंगरंगोटी करून सजविलेले लाकडी बैल, अर्ध्या
फुटापासून ते पाच फुटापर्यंतचे डौलदार आकर्षक बैल, यात कुणी बैलासह लावलेला सामाजिक संदेश, सजलेले बैल अन्‌
नटलेले चिमुकले, खाऊची धम्माल, बोजाऱ्याचे समाधान आणि मुलांनी केलेली देवी देवतांपासून महापुरुषांची
वेशभूषा…सर्वांचेच कौतुक, अज्ञा उत्साहपूर्ण वातावरणात  मुल शहरात अनेक ठिकाणी तान्हा पोळा साजरा करण्यात आला.

बालगोपालांचा उत्साहाचा सण असलेला तान्हा पोळा  येथे मोठ्या उत्साहात पार
पडला. तान्हा पोळ्याचे आयोजन करण्यात आले होते.  बालगोपालांनी बैलांना आकर्षक सजावट करून, पोळ्यात
आणले होते. मुलांनी आकर्षक बैल सजावटीच्या माध्यमातून पर्यावरण, अंधश्रद्धा, शेतकरी आत्महत्या,
महागाई, स्त्री अत्याचार या सामाजिक विषयावर संदेश दिले.

फुगे, तोरण, पताका लावुन सजविल्या जातो. प्रसंगी महादेवाची गाणी वाजविली जातात. नंदी बैल भगवान महादेवाचे वाहन असल्याकारणाने महादेवाच्या नावाचा जयजयकार केल्या जातो. त्यानंतर मुलांना काकडी व खोबऱ्याचा प्रसाद वाटप केल्या जाते. आणि पोळा फुटला असे जाहीर केल्या जाते. गेल्या काही वर्षांपासुन या पोळ्याला संस्कृती व स्पर्धा याची झालर लागली आहे. अनेक पालक आपल्या मुलाला वेगवेगळ्या वेशभुषांमध्ये सजवुन आणतात. पोळा फुटायच्या आधी या सगळ्या छोट्या मुलांचे वेशभुषा निरीक्षण केले . तसेच त्यांनी सजावुन आणलेल्या बैलाचे निरीक्षण केले जाते. पोळा फुटल्यानंतर उत्तम वेशभुषा व बैलाची उत्तम सजावट केलेल्या मुलांना क्रमांका प्रमाणे नंबर देऊन, त्यांना योग्य ते पारितोषिक दिल्या जाते. त्याचप्रमाणे सगळ्याच मुलांना काहीनाकाही छोटी भेटवस्तु दिली जाते.त्यानंतर ही मुले घरी येतात. ज्याप्रमाणे मोठ्या बैलांची सर्व प्रथम घरी पुजा केल्या जाते. त्याचप्रमाणे या लाकडी बैलांच्या पूजेला देखील घरुन सुरुवात होते.  मुले आपल्या शेजारी व नातेवाईकांकडे जाऊन बोजारा जमा करतात, म्हणजे त्यांना पैसे किंवा भेटवस्तु दिल्या जाते.लहान मुलांना देखील शेतीचे व त्यात राबराब राबणाऱ्या बैलांचे महत्व कळावे. आपल्या कृषीप्रधान संस्कृती विषयी ते कृतज्ञ राहावे, यासाठी कदाचित तान्हा पोळा हा सण साजरा करण्याची प्रथा रुजली असावी.