गणेश उत्सवामध्ये काही अनुचित घटना घडू नये म्हणून मूल नगर प्रशासन व पोलिस प्रशासनाच्या वतीने विसर्जन स्थली तलावावर

24

पोलिस अधीक्षकांकडून. गणेश विसर्जन स्थळाची पाहणी

आगामी गणेशोत्सव शांततेत व उत्साहपूर्ण वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीने पोलिस व 
प्रशासनाच्या वतीने विसर्जन स्थळाची पाहणी करण्यात आली. दरवर्षी गणेशोत्सव मोठ्या उत्साहातसाजरा केला जातो. घरोघरी लाडक्या गणरायाची स्थापना करण्यात येते. गणेशोत्सवादरम्यान सर्वत्र आनंदाचे
वातावरण असते. दहा दिवस मनोभावे आराधना केल्यानंतर बाप्पाला साश्रू नयनांनी निरोप दिला जातो.
गुलालाची उधळण करीत संगिताच्या तालावर विसर्जन मिरवणूकीत भक्तगण तल्लीन होऊन जातात.
भाविकांना विसर्जन मिरवणूकीत कुठलीच अडचण येऊ नये यासाठी प्रशासनाकडून काळजी घेण्यात येत
आहे. त्याअनुषंगाने पोलिस व प्रशासनाच्या वतीने तलावाची पाहणी करण्यात आली. विसर्जन स्थळाच्या ठिकाणी आव्यक सुविधा उपलब्धकरुन देण्याच्या दृष्टीने संदर्भात चर्चा करण्यात आली. 

मुल हे गणेशोत्सवासाठी विदर्भातील प्रसिद्ध ठिकाण असून मोठ्या जल्लोषात उत्साहात येथे गणेश विसर्जन साजरा केला जातो.गणेश उत्सवामध्ये काही अनुचित घटना घडू नये म्हणून मूल नगर प्रशासन व पोलिस प्रशासनाच्या वतीने विसर्जन स्थली तलावावर संपूर्ण स्वच्छता करण्यात आली. मुल येथील विभागीय पोलीस अधिकारी इंगळे मूल येथील पोलीस निरीक्षक सतीश सिंह राजपूत उपनिरीक्षक राठोड यांच्या उपस्थितीत संपूर्ण स्वच्छता मूल नगरपालिकेचे आरोग्य व स्वच्छता अधिकारी अभय चेपूरवार यांनी नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या वतीने संपूर्ण स्वच्छता ज्या ठिकाणी गणपतीचे विसर्जन केला जातो तिथे बॅरिकेट बांधून तेथील संपूर्ण स्वच्छता करण्यात आली .

या सगळ्या स्वच्छतेची पाहणी चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक साळवे साहेब यांनी केली , मुर्त्यांच्या झाकी साठी मूल हे प्रसिद्ध असून येथे गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो .

तालुक्यातून मोठ्या प्रमाणात गणेश भक्त बाप्पाला निरोप देण्याकरता येतात त्यामुळे वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून प्रशासनाच्या वतीने आधीच नियोजन केल्या जात असते.