हंगामातील पिकांना यावर्षी ऐनवेळी उपयुक्त असा पाऊस पडत असल्याने पिकेही चांगली बहरली आहेत. मात्र, बहरलेल्या या कोवळ्या पिकांवर वन्यप्राणी ताव मारून पिकांचे नुकसान करीत आहेत. याबाबत अधिकाऱ्यांपासून ते लोकप्रतिधी पर्यंत सर्वांची दारे ठोठावून सुद्धा शेतकऱ्यांकडे कुणीही लक्ष देत नाही, त्यामुळे हताश झालेले शेतकरी आता ‘सांगा, आम्ही शेती करायची का नाही?’ असा सवाल करीत आहेत.मुल तालुक्यातील वनक्षेत्रातील वन्यप्राणी वनालगतच्या’वनालगतच्या शेतशिवारात धुमाकूळ घालत असल्याने धानपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसानहोत आहे. आधीच अतिवृष्टीनेशेतक-यांचे कंबरडे मोडले आहे.त्यात आणखी आता जंगलीप्राण्याच्या उपद्रवाने शेतकरीहवालदिळ झाले आहे. मुळतालुका हा धान उत्पादक तालुकाम्हणून विदर्भात प्रसिद्ध आहे.येथे उत्पन्न होणा-या धानाला बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात मागणी आहे. तालुक्यातील खरीप हंगामातील सर्वात जास्त क्षेत्र हे भात पिकाचे आहे. वनालगत असलेल्या शेतशिवारात कळपाने रानटी डुकरे शेतात येऊन नुकसानकरतात. यामुळे शेतक-यांचेमोठ्या प्रमाणात नुकसान होतआहे. शासनाकडून मिळणारीनुकसान भरपाई ही नगण्यअसल्याने अगोदरच त्रस्तअसलेल्या शेतक-यांचे धान्यपिकाचे नुकसान वन्य प्राण्यांकडूनहोत असल्याने वन्य प्राण्यांचाबंदोबस्त करण्यासाठी शासनानेवनालगत गावातील शेतक-यांनाअनुदानावर काटेरी तार उपलब्ध करून द्यावी.