पट्टेदार वाघाच्या हमल्ल्यात एक गुराखी जखमी,जनमानसात भीतीचे वातावरण

40

करवंन येथील भाऊराव गेडाम वय ५५ वर्षे हा गुराखी गुरे चारण्याकरीता गावापासून सात किलोमीटर अंतरावर जंगलात गेला असता दबा धरून बसलेल्या पट्टेदार वाघाने त्याच्यावर हमला करून त्याला जखमी केले सदर घटना वन विभागाच्या अधिकाऱ्यांना माहीत होताच वन कर्मचारी तिथे दाखल झाले .तो चालू शकत नसलेल्या अवस्थेत असल्याने त्याला अक्षरशः कावड बांधून आण ून येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
सदर घटना मरोडा बीटातील कक्ष क्रमांक 775 मधली नसून या परिसरात वाघाच्या घटना बऱ्याच घडत असून या परिसरात सध्या वाघाची दहशत सुरू आहे. असे असताना नागरिकनी इतक्या खोल जंगलात जाऊ नये अशी ताकीत दिली असतानाही गुरे चरायला घेऊन जाणे योग्य नाही. असे मत येथील आर एफ घनश्याम नायगमकर यानी व्यक्त केले.