तरुणाची विहिरीत उडी घेत आत्महत्या

30

मुल: तालुक्‍यातील राजोली येथील एका अविवाहित युवकाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना (१६ ऑगष्ट) पहाटे ४ वाजतादरम्यान घडली.अमोल वामनराव फेथफुलवार वय ४० वर्षे असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. माना मोहला येथील सार्वजनिक विहिरीत उडी घेऊनआत्महत्या केली. आत्महत्या करण्यामागील कारण अद्याप कळलेले नाही. घटनेची माहिती मिळताच मुल पोलीस घटनास्थळी दाखल होऊनपंचनामा केला व मृतदेह मुल येथील उपजिल्‌हा रुग्णालयात उत्तरीय तपासणी करून नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले. अंतिम संस्कार राजोली येथील स्मशानभूमीत सायंकाळी ४.३० वाजताच्या दरम्यान करण्यात आले. त्याच्या परचात आई असा आप्तपरिवार आहे.