शेतकऱ्यांनो ‘ई-केवायसी’ची मुदत वाढली,31 ऑगस्टपर्यंत 2022,घरबसल्या मोबाईलद्वारे करा ई-केवायसी

238
केंद्र सरकारनं प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या (PM Kisan Latest News) लाभार्थ्यांना मोठी बातमी दिली आहे.

या योजनेअंतर्गत लाभ मिळवण्यासाठी सरकारनं ई-केवायसी करण्याची अंतिम तारीख 31 जुलै पासून 31 ऑगस्टपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. याचा अर्थ जे शेतकरी आतापर्यंत त्यांचे ई-केवायसी करू शकले नाहीत, ते आता 31 ऑगस्टपर्यंत करू शकतात. 12 वा हप्ता ई-केवायसी नंतरच मिळेल- या योजनेचा लाभ योग्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी केंद्र सरकारनं ई-केवायसी करण्याचा निर्णय घेतला आहे. जर तुम्ही देखील या योजनेचे लाभार्थी असाल आणि तुमची ई-केवायसी झाली नसेल, तर आगामी 12 व्या हप्त्याचे पैसे तुमच्या खात्यात येणार नाहीत.

पीएम किसानच्या ऑनलाइन पोर्टलवर दिलेल्या माहितीनुसार, या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांना ई-केवायसी करणं अनिवार्य आहे. तुम्ही PM किसानच्या ऑनलाइन पोर्टलवर मोबाइल OTP द्वारे हे करू शकता. तुम्ही बायोमेट्रिक आधारित ई-केवायसी देखील करू शकता. त्यासाठी तुम्हाला सीएससी केंद्राला भेट द्यावी लागेल.

घरबसल्या मोबाईलद्वारे करा ई-केवायसी-

  • यासाठी सर्वप्रथम तुम्हाला पीएम किसानच्या अधिकृत वेबसाइट pmkisan.gov.in वर जावं लागेल.
  • यानंतर, फार्मर कॉर्नरमध्ये (Farmer Croner) ई-केवायसी वर जा.
  • ई-केवायसी वर क्लिक केल्यावर तुम्हाला आधार कार्ड क्रमांक टाकावा लागेल
    • यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एक OTP येईल.
    • ओटीपी टाकल्यानंतर तुमची ई-केवायसी पूर्ण होईल.