‘जयपाल सिंह’ :हॉकीचा कर्णधार ते संविधान सभा या ग्रंथाचे प्रकाशन,’ जागतिक आदिवासी दिना’ निमित्य

75

मूल,
सरकारचे खाजगीकरण धोरण बघता आदिवासी समाजाने ओबीसी बांधवांच्या खांद्याला खांदा लावून चळवळी उभ्या करणे काळाची गरज आहे मागासवर्गीय आणि इतर मागासवर्गीय हे आपले बांधवच आहेत असे मत हिरालाल येरमे यांनी व्यक्त केले.
ते जागतिक आदिवासी दिनानिमित्त गुलगुलान साहित्य व संस्कृती मंच मूल च्या वतीने येतील कन्नमवार सांस्कृतिक सभागृहात आयोजित ‘जयपाल सिंह’ ‘हॉकीचा कर्णधार ते संविधान सभा’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याच्या अध्यक्ष स्थानावरून बोलताना मांडले. पुढे बोलताना ग्रंथालयाचे उपयोग समाजाने केला तरच साहित्य आणि त्यातील समाज उपयोगी गोष्टी घराघरात पोहोचतील इंटरनेटमध्ये गुरुपडून राहण्यापेक्षा पुस्तकाचे वाचन आयुष्यातील महत्त्वाच्या प्रगत वाटा शोधण्याकरिता मार्गदर्शक ठरतील असे विचार त्यांनी प्रगट केले. यावेळी प्रकाशन सोहळ्याचे प्रकाशक डॉक्टर राकेश गावतुरे यांनी आदिवासी समाज हा भोळा भाबडा आहे अत्यंत प्रामाणिकता समाजामध्ये अजूनही दृढ आहे. परंपरेनुसार अजूनही हा समाज वाटचाल करतो आहे ,यापुढे जाऊनआदिवासी ने साहित्य कडे सकारात्मक दृष्टिकोन ठेवून वाटचाल केल्यास समाज प्रगत होण्यास मदत होईल असे विचार प्रगट केले. जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून उलगुलान साहित्य व संस्कृती मंच मूल द्वारा आयोजित हा प्रकाशन सोहळा हिरालाल येरमे सामाजिक विचारवंत आरमोरी, यांच्या अध्यक्षतेखाली तर डॉक्टर राकेश गावतुरे सामाजिक कार्यकर्ते यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले .यावेळेस विचारपिठावर प्रभू राजगडकर. ज्येष्ठ साहित्यिक तथा से.नी.आधिकरी, धनंजय साळवे कवि तथा लेखक चंद्रपूर , राजेश मडावी समीक्षक तथा लेखक, रवी वाघाडे ,सामाजिक कार्यकर्ते चंद्रपूर ,माननीय नरेश भाऊ बोरीकर कवी चंद्रपूर, प्राध्यापक विजय लोणबले सामाजिक कार्यकर्ते तथा जिल्हाध्यक्ष समता परिषद महाराष्ट्र राज्य, डॉक्टर समीर कदम , अशोक येरमे अध्यक्ष मूल तालुका पत्रकार संघ, यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. सुनील संगेल , चिदानंद सिडाम यांनी संगीतबद्ध केलेल्या सुमधुर स्वागत गीताने पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. आदिवासी संस्कृतीची जपणूक म्हणून एक गोंडी नृत्य सादर करण्यात आले. उपस्थित सर्व पाहुण्यांनी प्रकाशन सोहळ्या संबंधी प्रब्रम्हानंद मडावी यांनी भविष्यात वेगवेगळे साहित्य प्रकाशित करून साजसेवी कार्य करावे अशा शुभेच्छा सर्वांनी दिल्या.
कार्यक्रमाचे संचालन प्रवीण सुरपाम, तर पाहुण्याचे व उपस्थितांचे आभार दीपक कुळ मेथे यांनी मानले,
सदर कार्यक्रमात मोठ्या संख्येने समाज बांधव,भगिनी उपस्थित होत्या.ऊलगुलांन साहित्य व संस्कृतील मंच मुल च्या द्वारा आयोजित ‘ जागतिक आदिवासी दिना’ निमित्य प्रसिद्ध कवी तथा लेखक प्रब्रम्हानंद मडावी लिखित ‘जयंपालसिंह :हॉकीचा कर्णधार ते संविधान सभा’ या ग्रंथाचे प्रकाशन सामाजिक कार्यकर्ते डॉ. राकेश गावतुरे यांचे हस्ते आणि सामाजिक विचारवंत हिरालाल येरमे यांच्या अध्यक्षतेखाली स्थानिक कन्नमवार सभागृहात पार पडले.

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध कवी प्रभू राजगडकर तसेच धनंजय साळवे, प्रा. विजय लोनबले, नरेशकुमार बोरीकर, डॉ. कदम, रवी वाघाडे, तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक येरमे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलतांना डॉ राकेश गावतुरे म्हणाले की, कर्तृत्वाने मोठी असलेली माणसे उजेडात आली नाहीत.हॉकीचा कर्णधार आणि संविधान सभेत वंचित आदिवासींच्या हक्कासाठी लढणारा महापुरुष होता. त्याच्या संघर्षातून बहुजन समाजाने प्रेरणा घेऊन सामाजिक संवाद निर्माण करावा यासाठी या पुस्तकाचे महत्व मोठे आहे.इतिहास निर्माण करणाऱ्या महामानवाचा इतिहास लिहिल्या गेला नाही अशी खंत व्यक्त केली.अध्यक्षीय भाषण करताना हिरालाल येरमे म्हणाले की, इतिहासाचे पुनर्लेखन केल्याशिवाय आदिवासींना आणि बहुजनांना न्याय मिळणार नाही म्हणूनच अशा ग्रंथाची आज गरज असल्याचे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले.यावेळे प्रभू राजगडकर, डॉ. समीर कदम, प्रा. विजय लोनबले, धनंजय साळवे, नरेशकुमार बोरीकर, रवी वाघाडे, यांनी सदर ग्रंथाचे महत्व अधोरेखित केले.कार्यक्रमाचे संचालन प्रवीण सुरपाम यांनी तर प्रास्ताविक संतोष सिडाम यांनी केले. आभार दीपक कुळमेथे यांनी मानले.स्वागतगीत राजेश संगेल आणि चिदानंद सिडाम यांच्या चमूने सादर केले.

 

यावेळी चित्रकार भारत सलाम सर, आणि मॅरेज ब्युरो चे संचालक लक्ष्मण सोयम यांचा मान्यवरांचे हस्ते सन्मानचिन्ह तथा शाल देऊन सत्कार करण्यात आलाजागतिक आदिवासी दिनानिमित्त आणि क्रांती दिनानिमित्त मूल येथील गांधी चौकातून गांधीजींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून रॅली वाजत गाजत कन्नमवार सभागृहात नेण्यात आली.
पुस्तकाचे पुखपृष्ठकार चित्रकार भारत सलाम यांचा,समाजातील उत्कृष्ट समाजसेवक म्हणून लक्ष्मण सोयाम सर यांचा शाल स्मृती चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी, एकनाथ गेडाम,डॉ. कुळमेथें ,बलस्वामी कुंभरे, अरविंद मेश्राम,बाळकृष्ण कुळमेथे, बंसोड सर, गेडाम सर,यांनी अथक परिश्रम घेतले.