मूल
काही दिवसांपूर्वी झालेल्या अतवृष्टीमुळे तालुक्यातील शेकडो नागरिकांचे नुकसान झाले आहे. अनेकांच्या घरात पावसाचे पाणी शिरल्याने अन्न-धान्य व कपडे वाहून गेले असून काहीचे घरही पडले आहेत. त्यामुळे नैसर्गिक संकटाच्या काळात आपत्तीग्रस्तांना सहकार्य करण्यासाठी स्थानिक ग्रामीण विकास समितीने पुढाकार घेतला आहे. मुंबई येथील दानशूर चंद्रकांतभाई गोगरी यांचे मार्गदर्शनात सामाजिक क्षेञात कार्यरत असलेल्या आरती फाऊंडेशनच्या सहकार्याने ग्रामीण विकास समितीचे कार्यवाह हरिभाऊ तेलंग यांनी एक हात मदतीचा उपक्रम हाती घेतला आहे.
९ ऑगस्ट या क्रांतिदिनी सकाळी ११ वा. स्थानिक ताडाळा मार्गावरील ग्रामीण विकास संस्थेच्या शैक्षणिक प्रांगणात पूरग्रस्त दलित पीडित शोषितांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. राजकीय व्यक्तींना बाजूला ठेवून आयोजित केलेल्या पुरग्रस्तांच्या मेळाव्यात समितीच्या कार्यकर्त्यांनी नोंदणी केलेल्या एकुण ३00 पुरग्रस्तांना सामाजिक व सेवाभावी कार्यकर्त्यांच्या हस्ते आवश्यक अन्नधान्याशिवाय ब्लँकेट आणि महिलांना साडीचोळी वितरित करण्यात येणार आहे. आयोजित मेळाव्यात सहभागी होण्यासाठी आपदग्रस्तांनी ग्रामिण विकास समितीच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधून लाभ प्राप्त करावा, अशी विनंती कार्यवाहक हरिभाऊ तेलंग यांनी केली आहे.
Home आपला जिल्हा मूल येथे पूरग्रस्तांचा मेळावा,९ ऑगस्ट क्रांतिदिनी एक हात मदतीचा उपक्रम-कार्यवाहक हरिभाऊ तेलंग