ऑगस्ट महिण्यातील पहिल्या रविवाराने मैत्रीचा दिवस सोमनाथ फुलले

60

प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात काही ना काही मित्र असतात. वय, लिंग, जातपात, श्रीमंत-गरीब या सर्वांच्या पलीकडे मैत्रीचे नाते  असते. कृष्ण आणि सुदामाच्या मैत्रीचे भारतात कायमच उदाहरण दिले जाते.  मैत्रीची भावना विश्वास, एकता आणि उत्साहपूर्ण आयुष्य जगण्याला प्रोत्साहित करते.फ्रेंडशिप डे दरवर्षी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी साजरा केला जातो. फ्रेंडशिप डे साजरा करतात. यावेळी आज 7 ऑगस्टला  मैत्रीचा हा खास दिवस साजरा होत आहे. नावाप्रमाणेच फ्रेंडशिप डे हा मैत्रीला समर्पित दिवस आहे. या दिवशी लोकं त्यांच्या मित्रांसोबत पार्टी करतात, फिरतात आणि त्यांची मैत्री साजरी करतात. मदर्स डे किंवा फादर्स डे सारखा फ्रेंडशिप डे साजरा करण्याची परंपरा आहे. शनिवार रविवार मैत्रीचा दिवससलग आलेल्या सुट्या, कोसळणारे धबधबे आणि श्रावण महिना असा हा तिहेरी संगम ऑगस्ट महिण्यात साधल्या गेल्याने सोमनाथ देवस्थान पर्यटकांनी चांगलेच फुलले आहे. येथील निसर्गातील अनमोल ठेवा डोळ्यात साठविण्यासाठी आणि धबधब्याचा मनसोक्त आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची पावले सोमनाथकडे वळत आहेत.
मूलपासून दहा कि.मी. अंतरावर असलेल्या सोमनाथ येथे शिवलिंग असलेले प्राचीन देवस्थान आहे. काळ्या पाषाणाचे हे शिवलिंग भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. मंदिराजवळूनच वाहणारा धबधबा पर्यटकांच्या आकर्षणात मुख्य भर घालत आहे. संततधार पावसामुळे धबधब्याच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. धबधब्याचा आवाज परिसरात घुमत असल्याने या नैसर्गिक वातावरणात मंगल आणि आनंदाचे सूर उमटत आहेत .
श्रावण सोमवार आणि महाशिवरात्रीला येथे पूजाअर्चा केली जाते. भव्य काळे पाषाण आणि त्यातून वाहणारा धबधबा, डोंगरदऱ्या, पशुपक्षी, वेली, पक्ष्यांचा किलबिलाट, हिरवी वनराई, आमराई, गुहा आणि गायमुख आदी सर्वच घटक पर्यटकांना मोहून टाकतात . त्यामुळे वनव्याप्त नैसर्गिक सौंदर्य लूटण्यासाठी, शिव लिंगाचे दर्शन घेण्यासाठी आणि धबधब्याच्या पाण्यात आंघोळीचा मनसोक्त आनंद घेण्यासाठी पर्यटकांची पाऊले सोमनाथ कडे वळत आहे.