मुल येथे महसूल दिन साजरा,महसूल दिनाचे तहसीलदार डाॅ.रविन्द्र होळी यांनी महत्व पटवून दिले

88

महसूल विभागाची नाळ ही शेतकरी तसेच ग्रामीण जनता यांच्याशी जोडलेली असल्याने हा विभाग शासन
आणि जनता यामधील महत्वाचा दुवा आहे,नैसर्गिक आपत्ती, निवडणूक अशा वेळी महसूल
विभागातील कर्मचारी नेहमीच कार्यतत्पर असतात, कोव्हीड महामारीच्या कालावधीतही महसूलच्या कर्मचाऱ्यांनी उत्कृष्टकामगिरी केल्याचे निसर्ग व तौक्ते चक्रीवादळ तसेच नुकत्याच झालेल्या पूरपरिस्थितीत’कोतवालापासून आपला जीव धोक्यात घालून महसूल विभागाने काम केले, अशा शब्दातमहसूल विभाग हा सर्वसामान्यजनतेपर्यंत पोहचणारे खाते आहे. कोणत्याही विभागाची कोणतीही योजना राबविण्यात महसूल विभागाचे सहकार्य असते.महसूल विभाग हा शासनाचा कणा आहे. आपल्याला वेगवेगळया माध्यमातून जनतेची सेवा करण्याची संधी मिळाली आहेत्यामुळे आपल्याकडे येणाऱ्या नागरिकांचे प्रश्न सकारात्मक दृष्टिकोन ठेवून नियमात राहून व अभ्यासपूर्ण पध्दतीने सोडवा,
असे आवाहन“ शासनाकडून येणाऱ्या नवनवीन योजना व प्रकल्पाचे नेतृत्व महसूल विभाग करते. कायदा
सुव्यवस्था, आपत्ती व्यवस्थापन, धान्य पुरवठा, जमिनीविषयक बाबी इत्यादी विविध कामे महसूल विभागामार्फत केली
जातात.येथील तहसील कार्यालयात सोमवार 1 आगष्ट महसूल दिनी महसूल दिन तहसीलदार डाॅ.रविन्द्र होळी यांच्या अध्यक्षतेखाली साजरा करण्यात आले.

अध्यक्षीय स्थानावरून तहसीलदार डाॅ.रविन्द्र होळी यांनी, महसूल विभाग हे शासनाचे मध्यवर्ती विभाग म्हणून कार्यरत असून जमीन महसूल वसूल, कायदा व सुव्यवस्था राखणे या मुख्य उद्देशाने सुरू झालेल्या प्रत्येक निवडणुका, जनगणना, आर्थिक गणना, कृषी गणना, विविध सामाजिक योजना, जातीचा दाखला, अधिवास दाखला, उत्पन्न दाखला, शेतकरी दाखले आदी आणि शासनाकडून जे कोणतेही मोठे अभियान राबविले जाते त्याची चोख व यशस्वीपणे अंमलबजावणी करणे महसूल विभागावर असते असे म्हणत कोरोनाच्या प्रादूर्भावातही महसूल विभागाचे कर्मचारी अविरतपणे कार्य करीत असल्याचे आवर्जून उल्लेख करून तहसीलदार डाॅ.रविन्द्र होळी यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.महसूल दिनाचे औचित्य साधून तहसील कार्याल मुल येथे जातीचे प्रमाणपत्र,उत्कृष्ठ कर्मचा-यांना प्रशस्तीपत्र,शेतकरी आत्महत्या ग्रस्त कुटुंबाना 1 लाख रकमेचे धन्यदेश,7/12वाटप,महसुल प्रकरणाचे आदेश वाटप,राशन कार्डवाटप,इत्यादी कार्यक्रम घेण्यात आले.यावेळी नायब तहसीलदार पवार साहेब,साधनकर साहेब,कुंभारे साहेब,ठाकरे साहेब, मंडळ अधिकारी, निरीक्षक, अव्वल कारकून बेलसुरे साहेब,पुजारी , शिपाई, कोतवाल आदी कर्मचारी उपस्थित होते.